छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगर येथील फुलंब्री परिसरात प्लास्टिकच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीच्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला. ही आग रविवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास लागली. प्लॅस्टिकच्या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फुलंब्री येथील दुकानात अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. आगीमुळे दुकान उघडण्यासाठी आलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याच्या घटना सतत घडतात. प्लास्टिकसारखे ज्वलनशील पदार्थ असल्यास आगीची तीव्रता आणखीन भडकते. आगीच्या दुर्घटनमुळे दुकाने आणि इतर व्यावसायिक आस्थापनांमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला. यात नितीन रमेश नागरे (वय 25), गजानन वाघ (वय 30), राजू सलीम पटेल (वय 25) सर्व राहणार फुलंब्री अशी मृतांची नावे आहेत. तर घटनेत शाहरुख सलीम पटेल आणि अजय सुभाष नागरे हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
- मिळालेल्या माहितीनुसार प्लास्टिक साहित्य विक्री करणाऱ्या दुकानाला रविवारी पहाटे शॉक सर्किटमुळे आग लागली. घटनेची माहिती झाल्यावर दुकान उघडताच तयार झालेल्या गॅसने तिघे फेकले गेले. होरपळून त्यांचा मृत्यू झाला.