महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एकतर्फी प्रेमातून छळ केल्यानं १६ वर्षीय मुलीची आत्महत्या, नागरिकांनी केला 'रास्ता रोको' - jatwada girl suicide

राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर उपस्थित झाला आहे. अशातच एकतर्फी प्रेमातून छळ झालेल्या तरुणीनं आत्महत्या केली. यानंतर स्थानिकांनी हर्सूल टी पॉईंट रस्त्यावर 'रास्ता रोको' आंदोलन केले.

chhatrapati sambhaji nagar crime
छत्रपती संभाजीनगर गुन्हा (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 21, 2024, 4:27 PM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - शहरात एकतर्फी प्रेमातून झालेल्या छळाला कंटाळून १६ वर्षीय तरुणीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जटवाडा भागात घडली. दुचाकी मेकॅनिकनं प्रेम करण्यासाठी दबाव टाकून तरुणीला त्रास दिला. त्यामुळे पीडितेनं आत्महत्या केली असल्याची तक्रार कुटुंबीयांनी पोलिसात दिली आहे. या घटनेनंतर स्थानिक रहिवासी संतप्त झाले आहेत. त्यांनी हर्सूल टी पॉइंट रस्त्यावर 'रास्ता रोको' आंदोलन करत आरोपीला फाशीची शिक्षा करत कडक शिक्षा करण्याची मागणी केली.



रविवारी केली होती आत्महत्या-अकरावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या तरुणीनं जटवाडा भागात आत्महत्या केली. त्याच भागात राहणाऱ्या गाडीचे गॅरेज चालवणाऱ्या तरुणाच्या त्रासाला कंटाळून तिनं टोकाचं पाऊल उचललं होतं. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांसह सकल हिंदू समाजाचा वतीनं आंदोलनाची हाक दिली. मुख्य आरोपीस इतर आरोपींना कडक शासन करण्याची मागणी करण्यात आली. हर्सूल टी पॉइंट रस्त्यावर रास्ता रोको केला. आरोपींना भरचौकात फाशी द्या, अशी घोषणाबाजी आंदोलकांनी केली. मुलींवर अत्याचार वाढत असल्यानं मुलींना मोकळ्यापणानं वावरता येतं नाही. कायदा कडक असून अंमलबजावणी होत नसल्यानं त्रास देण्याच्या घटना वाढल्याचा आंदोलकांकडून आरोप करण्यात आला.



छळाला कंटाळून तरुणीनं आत्महत्या केल्याचा दावा-१६ वर्षीय तरुणी ही नीट परीक्षेची तयारी करत करण्यासाठी कोकण वाडी येथे वसतिगृहात राहत होती. रक्षाबंधन सणासाठी ती दोन दिवसांपूर्वीच घरी आली होती. मात्र, त्याच भागात राहणारा दुचाकी मेकॅनिक तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. त्याच्याशी प्रेम जुळवण्यासाठी वारंवार दबाव आणत असल्याने ती त्रस्त झाली होती. दरम्यान ती घरी आल्यानं त्यानं संधीचा फायदा घेत आणखी त्रास दिला. सतत होणाऱ्या छळाला कंटाळून तरुणीनं अखेर आत्महत्या केली. रुग्णालयात डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आई-वडिलांना मुलीच्या आत्महत्येचे कारण सुरुवातीला कळले नाही. मात्र, त्यानंतर सर्व प्रकार लक्षात आला. पीडितेच्या कुटुंबीयांनी हर्सूल पोलिसात आरोपी विरोधात तक्रार दिली. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर मुख्य आरोपीसह त्याचे वडील आणि सहा भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा-

  1. अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला महिलेनं शिकवला धडा, उलतण्यानं हल्ला केल्यानं नराधमाच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर जखम - Thane Crime News
  2. सहाय्यक कामगार आयुक्तांनी महिलेचा केला विनयभंग, पदोन्नतीच्या बहाण्यानं कार्यालयात बोलावलं अन्... - Woman Molesting In Mumbai

ABOUT THE AUTHOR

...view details