केपटाऊन ICC Fined Pakistan : पाकिस्तान क्रिकेट संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला आणि यासह संघानं मालिका 0-2 नं गमावली. संपूर्ण मालिकेत पाकिस्तानी संघ महत्त्वाच्या प्रसंगी संघर्ष करताना दिसला आणि संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. आता मालिका गमावल्यानंतर पाकिस्तानी संघाचं आणखी नुकसान झालं आहे. केपटाऊन कसोटीत स्लो ओव्हर रेट राखल्याबद्दल आयसीसीनं त्याच्यावर कारवाई केली आहे.
Temba Bavuma said, " we'd love to play a lot more of test cricket and hopefully there's appetite and interest from other teams that want to come and play in south africa". pic.twitter.com/gmrmruSUbN
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 7, 2025
पाकिस्तानी संघाला मोठा धक्का : या कसोटी सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी, पाकिस्तानी संघाला मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतून पाच गुण वजा करण्यात आले. पेनल्टीनंतर, पाकिस्तानचा पीसीटी आता 24.31 वर घसरला आहे, जो पॉइंट टेबलच्या तळाशी असलेल्या वेस्ट इंडिजच्या 24.24 पीसीटीपेक्षा थोडा वर आहे. WTC 2023-25 च्या गुणतालिकेत पाकिस्तानी संघ आठव्या क्रमांकावर आहे आणि त्यांनी आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत, त्यापैकी चार जिंकले आहेत आणि 8 गमावले आहेत. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून ते आधीच बाहेर आहेत.
Pakistan have been fined, and docked World Test Championship points owing to slow-over rate during Cape Town Test.#SAvPAK #WTC25https://t.co/jxF35Nk086
— ICC (@ICC) January 7, 2025
पाकिस्तानी कर्णधारानं मान्य केली चूक : ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप प्लेइंग कंडिशनच्या कलम 16.11.2 नुसार पाच डब्ल्यूटीसी पॉइंट्स वजा केले गेले, ज्यात असं म्हटलं आहे की प्रत्येक षटक शॉर्ट टाकल्यास एका बाजूस एक गुण दंड आकारला जातो. त्यांच्यावर लावण्यात आलेला 25 टक्के दंड हा किमान ओव्हर-रेट गुन्ह्यांशी संबंधित आहे. सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांच्या आयसीसी एलिट पॅनलनं दंड मंजूर केला. पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदनं हे मान्य करत चुकीची कबुली दिली.
Pakistan fined 25% of their match fees and docked 5 WTC points for maintaining slow overrate. pic.twitter.com/DGMYVOthEh
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 7, 2025
दक्षिण आफ्रिकेनं उभारली 600 हून अधिक धावसंख्या : पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. संघानं पहिल्या डावात 615 धावांची हिमालयाएवढी मोठी धावसंख्या उभारली. यानंतर पाकिस्तानी फलंदाजांची पाळी आली, पण ते पहिल्या डावात फ्लॉप ठरले आणि संपूर्ण पाकिस्तानी संघ पहिल्या डावात केवळ 194 धावांवरच मर्यादित राहिला. पाकिस्तानला फॉलोऑन खेळावं लागलं. मात्र दुसऱ्या डावात पाकिस्तानकडून शान मसूद (145 धावा), बाबर आझम (81 धावा), मोहम्मद रिझवान, सलमान अली आगा यांनी चांगली फलंदाजी केली. या खेळाडूंमुळंच डावाचा पराभव टाळण्यात संघाला यश आलं. पाकिस्ताननं 478 धावा केल्या आणि आफ्रिकेला 58 धावांचे लक्ष्य दिलं, जे त्यांनी कोणतंही नुकसान न करता पूर्ण केलं.
हेही वाचा :