मुंबईBribe : सीबीआयनं (गुन्हे अन्वेषण विभाग) नवी मुंबईतील सीजीएसटीचे सहाय्यक आयुक्त आणि निरीक्षक यांना दीड लाख रुपयांची लाच घेल्याप्रकरणी अटक केली आहे. एका तक्रारीच्या आधारे सीबीआयनं आरोपी सहाय्यक आयुक्ताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दीड लाखांची लाच घेतली : तक्रारदार, एका ट्रान्सपोर्ट फर्मचे भागीदार असून, त्यांना बेलापूरच्या सहाय्यक आयुक्तांनी नवी मुंबई येथे 'कारणे दाखवा नोटीस' बजावली होती असा आरोप आहे. त्यानंतर तक्रारदारानं आवश्यक कागदपत्रे सादर केली. मात्र, आरोपी सहायक आयुक्तांनी सर्व कागदपत्रं अपुरी असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर सेवाकराशी संबंधित 'कारणे दाखवा नोटीस' निकाली काढण्यासाठी तक्रारदाराकडून सहा लाख रुपयांची लाच मागितली होती. परस्पर दोघांनी समजोता करून दोन्ही आरोपींनी दीड लाखांची लाच घेण्याचं मान्य केल्यानंतर तक्रारदाराला लाचेची रक्कम सीजीएसटीच्या निरीक्षकामार्फत देण्यास सांगण्यात आलं होतं.
रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडलं :याबाबत सीबीआयनं सापळा रचून सीजीएसटी बेलापूर, नवी मुंबईचे निरीक्षक शुभम दास महापात्रा आणि सहायक आयुक्त सुभाष भालेराव यांना तक्रारदाराकडून दीड लाख रुपये उकळल्याप्रकरणी अटक केली. या दोघांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ दोघांना सीबीआयनं पकडलं. आरोपीच्या निवासी आणि कार्यालयाच्या परिसरात झडती घेतली जात असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू आहे.
पोलिसाविरुद्ध दोन हजारांची लाच प्रकरणी गुन्हा : मुंबईतील अंधेरी पूर्व परिसरात देखील पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध लाच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधेरी पूर्व येथील शहर वाहतूक विभागात काम करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक फ्रान्सिस रॉकी रेगो यांच्याविरुद्ध लाच लुचपात प्रतिबंध विभागानं भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 च्या कलम सात अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराची दोन, चार चाकी वाहनं असून ही दोन्ही वाहनं ओला कंपनीत कामासाठी लावलेली आहेत. एक वाहन तक्रारदार स्वतः चालवतो, तर दुसरे वाहन चालकाकडं देण्यात आलं आहे. या चालकानं तक्रारदार यांना फोन करून कळवलं की, बिसलेरी जंक्शन येथे आपलं वाहन वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यावर 17000 दंड प्रलंबित आहे. गाडी सोडण्यासाठी दोन हजार रुपये द्यावे, लागतील असं सांगून फ्रान्सिस रेगो यांनी लाचेची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदार यांनी 14 मार्चला लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडं स्वतः हजर राहून लेखी तक्रार अर्ज दाखल केला. त्यानुसार एसीबीच्या पोलिसांनी केलेल्या सापळा कारवाईत पोलीस उपनिरीक्षक फ्रान्सिस रेगो यांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे.
हे वाचलंत का :
- Samir Wankhede Case : समीर वानखेडे यांच्या संदर्भातील चौकशीलाच दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे प्रश्नचिन्ह
- लाच प्रकरणात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महाव्यवस्थापकाला सीबीआयनं नागपुरातून केली अटक
- वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना मागायचा तांदळाची लाच; वीज कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात