मुंबईPA Dinesh Bobhate : उद्धव ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई (MP Anil Desai) यांचे स्वीय सहाय्यक (पीए) दिनेश बोभाटे यांच्यावर सीबीआयकडून (गुन्हे अन्वेषण विभाग) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने बेहिशेबी मालमत्ते संदर्भात दिनेश बोभाटे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे.
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण :उद्धव ठाकरे गटाला या बातमीमुळे मोठा दणका बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासाचे मानले जाणारे खासदार अनिल देसाई यांच्या स्वीय सहाय्यकाच्या अडचणीत वाढ झाली आहे. सीबीआयने स्वीय सहाय्यक दिनेश बोभाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
या कार्यकाळात मालमत्ता कमावल्याचा आरोप :2 कोटी 60 लाख रुपयांची रक्कम बेहिशेबी कमवल्याचा आरोप सीबीआयकडून करण्यात आला आहे. सीबीआयने दिनेश बोभाटे यांच्या विरोधात 17 जानेवारीला मुंबई कार्यालयात गुन्हा दाखल केला होता. दिनेश बोभाटे 2013 ते 2023 दरम्यानच्या कालावधीत एका इन्शुरन्स कंपनीत असिस्टंट आणि सिनियर असिस्टंट म्हणून काम करत होते. यादरम्यान त्यांनी संबंधित इन्शुरन्स कंपनीत काम करत असताना जवळपास 36 टक्के बेहिशेबी मालमत्ता कमवल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.
पत्नीच्याही विरुद्ध गुन्हा दाखल :सीबीआयने या प्रकरणी दिनेश बोभाटे आणि त्यांच्या पत्नी देवश्री बोभाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या दाम्पत्यानं जवळपास 2 कोटी 60 लाख रुपयांची रक्कम बेहिशेबी कमवल्याचा आरोप सीबीआयनं केला आहे. त्यामुळे दिनेश बोभाटे आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे. आता अनिल देसाईंच्या पीएच्या अडचणीत वाढ झाली आहे. हो दोघेही आता सीबीआयच्या चौकशीच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा:
- लोकशाही संपवण्याच्या दिशेनं टाकलेलं पुढचं पाऊल; राहुल नार्वेकरांच्या निवडीवरुन उद्धव ठाकरेंची टीका
- 'मम्मी-पप्पा, मी जेईई करू शकत नाही, मला माफ करा'; परीक्षेच्या आधी कोटामध्ये 18 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या
- वेळ देत नसल्यानं चारित्र्यावर संशय; प्रियकरानं 'Oyo'मध्येच केला प्रेयसीचा गेम