महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपाच्या दोन आमदारांवर गुन्हे दाखल, नितेश राणे, गीता जैन यांच्या अडचणीत वाढ - Nitesh Rane provocative speech - NITESH RANE PROVOCATIVE SPEECH

Nitesh Rane : भाजपा आमदार नितेश राणे तसंच गीता जैन यांच्या अडचणीत वाढ झालीय. मुंबईतील मालवणी, मानखुर्द तसंच घाटकोपर भागातील सभांमध्ये आक्षेपार्ह, प्रक्षोभक भाषणं केल्याचा आरोप नितेश राणे तसंच गीता जैन यांच्यावर आहे.

Nitesh Rane
Nitesh Rane

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 23, 2024, 10:57 PM IST

मुंबईNitesh Rane : भाजपा आमदार नितीश राणे तसंच गीता जैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याचं महाराष्ट्र पोलिसांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं. पोलिसांनी सांगितलं की, तपासादरम्यान आढळून आलं की, ठाणे जिल्ह्यात जानेवारी महिन्यात झालेल्या जातीय हिंसाचाराच्या वेळी दोघांनी आक्षेपार्ह भाषण केलं होतं.

प्रक्षोभक भाषण केल्याचं उघड : न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे तसंच न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठानं गेल्या आठवड्यात संबंधित पोलीस आयुक्तांना दोन्ही नेत्यांनी आक्षेपार्ह, प्रक्षोभक भाषणे केली होती का, याची वैयक्तिक पडताळणी करण्यास सांगितलं होतं. सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी आज न्यायालयाला सांगितलं की, या वर्षी जानेवारी महिन्यात मीरा भाईंदरमध्ये झालेल्या जातीय हिंसाचाराच्या वेळी नितेश राणे तसंच जैन यांनी केलेली भाषणे प्रक्षोभक होती, असं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

सभांमध्ये आक्षेपार्ह भाषण :मुंबईतील मालवणी, मानखुर्द तसंच घाटकोपर भागातील सभांमध्ये आक्षेपार्ह भाषण केल्याचा राणेंवर आरोप असल्याचं वेणेगावकर म्हणाले. तर जैन यांच्यावर मीरा भाईंदरमधील सभेत आक्षेपार्ह भाषण केल्याचा आरोप आहे.सरकारी वकील हितेन वेणेगावकर पुढं म्हणाले की पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 153A (धर्माच्या आधारावर लोकांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे), 504 (हेतुपुरस्सर अपमान), 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत एफआयआर नोंदविला आहे.

हिंसाचाराच्या संदर्भात 13 स्वतंत्र एफआयआर :मीरा भाईंदरमध्ये 22 ते 26 जानेवारी दरम्यान उसळलेल्या जातीय हिंसाचाराच्या संदर्भात 13 स्वतंत्र एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणांचा तपास सुरू असल्याचं वेणेगावकर यांनी सांगितलं. खंडपीठानं या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 जून रोजी निश्चित केलीय. या वर्षी जानेवारीमध्ये, ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथे कथित प्रक्षोभक भाषणाविरोधात राणे, जैन आणि तेलंगणाचे आमदार टी राजा सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकांवर न्यायालय सुनावणी करतय. या भागातील जातीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ही भाषणं दिली गेली, असा दावा याचिकांमध्ये करण्यात आला आहे. याचिकांमध्ये आमदारांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी करण्यात आली होती.

हे वाचलंत का :

  1. "भाजपा देशाचं भविष्य तर काँग्रेस भूतकाळ", उदयनराजेंचा हल्लाबोल - Udayanraje Bhosale
  2. अमरावतीत 'जंग ऐ मैदान'; अमित शाहांच्या सभेवरुन बच्चू कडू आक्रमक; भाजपावर हल्लाबोल - Amravati Lok Sabha Election 2024
  3. अरे, आवाज कुणाचा? एकेकाळचे खंदे सहकारी आता कट्टर विरोधक, शिवसेना विरुद्ध शिवसेनेच्या लढाईत कोण मारणार बाजी? - Lok Sabha Election 2024

ABOUT THE AUTHOR

...view details