महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे : ब्राझीलच्या दांपत्याचं पुण्यात वैदिक पद्धतीनं लग्न - BRAZILIAN COUPLE MARRIED VEDIC

ब्राझीलहून पुण्यात आयुर्वेद शिकण्यासाठी आलेल्या दाम्पत्याने आज वैदिक पध्दतीने लग्न केले. यावेळी दाम्पत्याने भारतीय वेशभूषा केली होती.

BRAZILIAN COUPLE MARRIED VEDIC
पुण्यात वैदिक पद्धतीने लग्न करणारे ब्राझीलतचे दामप्त (Etv Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 24, 2025, 10:28 PM IST

Updated : Jan 24, 2025, 11:02 PM IST

पुणे : सध्या मोठ्या प्रमाणावर परदेशातून नागरिक हे भारतासह पुणे शहरात येतात. भारतीय परंपरेची परदेशी पाहुण्यांना भुरळ पडते, आणि ते भारतीय संस्कृतीमध्ये मग्न होतात. असा काहीसा प्रकार ब्राझील येथील एका दाम्पत्याच्या बाबत झालं आहे. आयुर्वेद शिकायला पुण्यात आलेल्या या जोडप्याला आपल्या भारतीय संस्कृती आणि परंपरा आवडली. लग्न झालेलं असताना देखील आज त्यांनी 22 वर्षानंतर पुन्हा वैदिक पद्धतीनं लग्न केलं.

ब्राझीलच्या दांपत्याचं पुण्यात वैदिक पद्धतीनं लग्न (ETV Bharat Reporter)

ब्राझील इथले डॉ.रोसंगेला आणि ब्राईड हे जोडपं काही वर्षांपूर्वी पुण्यात आयुर्वेदच शिक्षण घेण्यासाठी आले होतं. आयुर्वेदाचे शिक्षण घेत असताना या जोडप्याला भारतीय संस्कृती आणि परंपरा ही खूप आवडली. या ब्राझील मधील दांपत्याच लग्न झालेलं असताना देखील पुण्यात आज आयुर्वेद ग्राम कॉन्टॅक्ट बाणेर येथे 22 वर्षानंतर त्यांनी पुन्हा वैदिक पद्धतीनें लग्न केलं.

वैदिक पद्धतीनं लग्न केल्यानंतर फोटो काढताना डॉ.रोसंगेला आणि ब्राईड (ETV Bharat Reporter)

यावेळी ब्राईड यांनी गुलाबी साडी नेसली होती. तर, डॉ.रोसंगेला यांनी शेरवानी परिधान केली होती. यावेळी ब्राझीलवरून आलेले डॉक्टर यांचं वराडी मंडळी उपस्थित होतं. सप्तपदी, मंगलाष्टक म्हणत हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी उपस्थितांनी गुलाबी साडी गाण्यावर नाचत लग्नाचा आनंद घेतला. याबाबत डॉक्टर सुकुमार देशमुख म्हणाले की, हे दाम्पत्य डॉक्टर असून आयुर्वेद शिकण्यासाठी पुण्यात आले होते. यावेळी त्यांना भारतीय संस्कृती आणि परंपरा ही खूप आवडली. तेव्हा त्यांनी मला भारतीय पद्धतीनं पुन्हा एकदा लग्न करायचं आहे अस सांगितल. तेव्हा मी याला होकार दिली आणि आज त्यांचं वैदिक पद्धतीने लग्न लावण्यात आलं.

पुण्यात वैदिक पद्धतीने लग्न करणारे ब्राझीलतचे दामप्त (ETV Bharat Reporter)

हेही वाचा :

  1. पुण्यातील तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांना उच्च न्यायालयाचा दिलासा
  2. पुणे हादरलं! मुलासमोरच कात्रीनं वार करून केली पत्नीची हत्या, थरारक व्हिडिओ व्हायरल
  3. काका-पुतण्या एकाच मंचावर; एकमेकांच्या शेजारी बसणं टाळलं, कार्यक्रमात काय घडलं? पाहा व्हिडिओ
Last Updated : Jan 24, 2025, 11:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details