अकोले (अहमदनगर) Bike Thief Arrested :अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील शेंडी व राजूर इथून दोन बुलेट गाड्या चोरीला गेल्या होत्या. या गाड्यांच्या चोरी प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध राजुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर राजुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक सरोदे यांनी घटनास्थळी भेट देत गुन्हा करण्याची पद्धत पाहुन व सीसीटीव्ही फुटेज तपासून गोपनीय बातमीदारानं दिलेल्या माहितीवरुन घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंकर एकनाथ गांगड या संशयित ईसमास ताब्यात घेतलं.
चोरट्याकडून 10 मोटरसायकल जप्त : या इसमाची सखोल चौकशी केली असता त्यानंच त्याच्या साथीदारांसोबत शेंडी व राजुर इथून दोन बुलेट गाड्यांची चोरी केल्याची कबुली दिली. तसंच या संशयिताला अधिक विश्वासात घेऊन चौकशी कल्यानंतर त्यानं ठाण्यातील शहापुर व नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतुनही आणखी 8 मोटारसायकल चोरी केल्याची माहीती दिलीय. यानंतर राजुर पोलिसांनी या इसमाकडुन 10 रेसर गाड्या ताब्यात घेतल्या असुन 10 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.