महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत लवकरच बाईक टॅक्सी सेवा, महिला सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना - BIKE TAXI SERVICE

ओला आणि उबेरच्या टॅक्सी सेवेप्रमाणेच रॅपिडोच्या बाईक राईडचा पर्यायही प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आलाय. त्यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास अधिकच सुस्साट होण्याची शक्यता आहे.

Bike taxi service to be launched soon in Mumbai
मुंबईत लवकरच बाईक टॅक्सी (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 30, 2025, 3:33 PM IST

मुंबई-महाराष्ट्र परिवहन विभागाने बुधवारी मुंबईत रॅपिडो बाइक टॅक्सी सेवेला परवानगी दिलीय. येत्या दोन महिन्यांत मुंबईत रॅपिडोसारखी बाईक सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. ओला आणि उबेरच्या टॅक्सी सेवेप्रमाणेच रॅपिडोच्या बाईक राईडचा पर्यायही प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आलाय. त्यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास अधिकच सुस्साट होण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबईत ही बाईक टॅक्सी सुरू झाली होती. मात्र, टॅक्सी संघटना आणि रिक्षा संघटनांनी याला आक्षेप घेतल्यानंतर याला स्थगिती देण्यात आली होती. मात्र, बुधवारी झालेल्या बैठकीत बाईक टॅक्सीला पुन्हा एकदा परवानगी देण्यात आलीय.

महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी :मिळालेल्या माहितीनुसार, रॅपिडोच्या बाईक टॅक्सी सेवेला परवानगी देताना परिवहन विभागाने काही नियम आणि अटीदेखील घालून दिल्या असून, महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचनादेखील विभागाने दिल्यात. रॅपिडो बाईक टॅक्सी सेवा आजच्या घडीला दिल्ली आणि नोएडा यांसारख्या शहरांमध्ये उपलब्ध आहे. आता मुंबईतही रॅपिडो बाईक टॅक्सी सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत गोवा, तेलंगणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी बाईक टॅक्सींना परवानगी दिलीय, तर महाराष्ट्र आणि दिल्लीने यापूर्वी बंदी घातली होती.

मुंबईत लवकरच बाईक टॅक्सी (Source- ETV Bharat)

बाईक टॅक्सी सेवेची मागणी दिवसेंदिवस वाढतीच :देशातील विविध राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये बाइक टॅक्सी सेवेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. बाईक टॅक्सी सेवेचे भाडे ओला अन् उबेर कार टॅक्सी, काळी पिवळी कार टॅक्सी, ऑटो रिक्षा यांच्या तुलनेत निम्म्याहून कमी आहे. कारच्या तुलनेत दुचाकीवरील प्रवास अधिक जलद होतो. वाहतूक कोंडीतदेखील अडकून राहावं लागत नाही. त्यामुळे सध्या बाईक टॅक्सी सेवेची मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. लोकांसाठी मोठी सोय बनलेल्या बाईक सेवा उद्योगाचा आकारही दरवर्षी झपाट्याने वाढत आहे, यातून अनेकांना रोजगार देखील मिळतोय.

हेही वाचा..

  1. पुणे विभागात जीबीएस सिंड्रोममुळे दुसरा मृत्यू
  2. कोल्हापुरातही जीबीएसचा शिरकाव, दोन रुग्ण सीपीआरमध्ये दाखल; शहरात खळबळ

ABOUT THE AUTHOR

...view details