महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rahul Gandhi : राहुल गांधी त्र्यंबकराजाच्या चरणी लीन, महिलांसाठी केली मोठी घोषणा - Rahul Gandhi In Nashik

Rahul Gandhi In Nashik : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची (Rahul Gandhi) भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) आज (14 मार्च) नाशिकमध्ये दाखल झाली. यावेळी राहुल गांधी यांनी त्र्यंबकेश्वरला जात महादेवाचं दर्शन घेतलं.

Bharat Jodo Nyay Yatra In Nashik Congress Leader Rahul Gandhi took darshan of Trimbakeshwar Jyotirling Mandir
राहुल गांधी त्र्यंबकराजाच्या चरणी लीन

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 14, 2024, 10:47 PM IST

Updated : Mar 14, 2024, 11:01 PM IST

राहुल गांधी यांनी घेतलं त्र्यंबकराजांचं दर्शन

नाशिक Rahul Gandhi Speech : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे आज (14 मार्च) भारत जोडो न्याय यात्रेसाठी नाशिकमध्ये होते. शहरात झालेल्या रोड शो नंतर त्यांनी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात जाऊन रुद्राभिषेक करत आरती केली. यावेळी त्यांच्या समवेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मंदिर प्रशासनाच्या वतीनं राहुल गांधी यांचं स्वागत करण्यात आलं.


जातीय जनगणना करा :राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज महाराष्ट्रातील तिसरा दिवस आहे. बुधवारी (13 मार्च) ते मालेगाव मध्ये होते. त्यानंतर आज नाशिक शहरात काढण्यात आलेल्या रोड शो चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील द्वारका भागात ढोल ताशाच्या गजरात हजारो काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राहुल गांधींचं स्वागत केलं. यावेळी बोलत असताना राहुल गांधी म्हणाले की, "देशात किती दलित, आदिवासी, मागासवर्गीय आहेत हे जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारनं जातीय जनगणना करावी, यासाठी देशातील प्रत्येक नागरिकांनी आवाज उठवणं आवश्यक आहे." तसंच भारतीय जनता पार्टी देशात जातीय तेढ निर्माण करण्याचं काम करतंय. अशात देशातील एकता अखंडित राहावी यासाठी काँग्रेस पक्षाकडून भारत जोडो अभियान राबवण्यात आल्याचंही ते म्हणाले.

आश्वासनांचा वर्षाव :लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावेळी राहुल गांधींनी आश्वासनांचा वर्षाव केला. ते म्हणाले की, "देशात पुन्हा एकदा काँग्रेस सरकार आल्यावर गरीब महिलांना वर्षाला एक लाख रुपये दिले जाईल. तसंच सरकारी विभागात बेरोजगारांसाठी तीस लाख नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जातील." पुढं ते म्हणाले की, "देशातील शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे, कामगारांचे प्रश्न घेऊन ही यात्रा सुरू आहे. केंद्रातील मोदी सरकारनं उद्योगपतींचे 16 लाख करोड रुपयांचे कर्ज माफ केले. पण गरीब नागरिकांचा एकही रुपया त्यांनी माफ केला नाही," असं म्हणत त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली.

हेही वाचा -

  1. Rahul Gandhi News: उद्योगपतींची १६ लाख कोटींची कर्जमाफी म्हणजे २४ वर्षांची मनरेगा योजना-राहुल गांधी
  2. Bharat Jodo Nyaya Yatra : राहुल गांधी यांचं मालेगावात जोरदार स्वागत! जाहीर सभेतून गांधींची मोदींवर जोरदार टीका
  3. Rahul Gandhi Speech : "पंतप्रधानांनी 20-25 उद्योगपतींचं 16 लाख कोटींचं कर्ज...", राहुल गांधींचा गंभीर आरोप
Last Updated : Mar 14, 2024, 11:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details