महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"विकृत कृत्य करणाऱ्याचं गुप्तांग कापलं पाहिजे"; अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया - Ajit Pawar on Badlapur Incident - AJIT PAWAR ON BADLAPUR INCIDENT

Ajit Pawar : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झालीय. बदलापूरमधील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली होती. त्यानंतर बदलापुरात पालकांचा आणि नागरिकांचा उद्रेक झाला होता. अशा घटनांना आळा घालण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जालीम उपाय सांगितलाय.

ajit pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार संग्रहित छायाचित्र (Source : ETV Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 25, 2024, 8:20 AM IST

Updated : Aug 25, 2024, 8:51 AM IST

मुंबई/यवतमाळ Ajit Pawar :बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर राज्यात विविध ठिकाणी अशा प्रकारची प्रकरणं आता समोर येत आहेत. त्यामुळं पालकांच्या मनात भीतीचं वातावरण पसरलंय. बदलापूर अत्याचार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीनं शनिवारी राज्यभरात आंदोलन केलं होतं. दरम्यान, दोषींना कठोर शिक्षा देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

अजित पवारांनी सांगितला उपाय : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार संतापल्याचं पाहायला मिळालं. अशा घटनांना आळा घालण्यासाठी अजित पवारांनी एक जालीम उपाय सांगितला. "महिला, मुलींवर हात टाकणाऱया नराधमाचं गुप्तांग कापलं पाहिजे," असा उपाय सांगत अजित पवारांनी संताप व्यक्त केला.

कायद्याचा धाक असायला पाहिजे : अशा घटना रोखण्यासाठी कायद्याचा धाक असायला पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले. "जे नराधम आमच्या महिला, मुलींवर हात टाकतात त्यांना कायद्यानं कठोर शिक्षा झालीच पाहिजे. अशा नराधमांना कायद्याचा धाक असलाच पाहिजे. मी तर म्हणेल की, महिला, मुलींवर हात टाकणाऱयाचं तर गुप्तांगच कापलं पाहिजे, जेणेकरून तो नराधम दुसऱयांदा असं कृत्य करण्याचा विचारही करणार नाही," असा जालीम उपाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितला.

भगिनींच्या संरक्षणासाठी कमी पडणार नाहीत :"माझ्या बहिणींसाठी आम्ही माझी लाडकी बहीण योजना आणली. या योजनेला माझ्या मायमाऊलींनी भरघोस प्रतिसाद दिला. मात्र, हे विरोधकांच्या डोळ्यांत खुपतंय. महिला सुरक्षेला घेऊन आम्ही अतिशय संवेदनशील आहोत. भगिनींच्या संरक्षणासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही असा शब्द देतो. गृहमंत्र्यांनी पोलीस भरतीचे आदेश जारी केले आहेत. चुकी करणारा, गुन्हा करणारा कितीही मोठ्या बापाचा असू देत, त्याला शासन होणारंच. कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही," अशा कठोर शब्दात अजित पवारांनी सुनावलं.

विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर :"अत्याचाराच्या घटना घडल्या की विरोधकांकडून आमच्यावर टीका केली जाते. मात्र, महिला सुरक्षेला घेऊन सरकार अतिशय गंभीर आहे. गृहमंत्र्यांनी नवीन पोलीस भरतीचे आदेश दिलेत. विकृतांना कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी कडक कायदे केले जात आहेत," असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.

हेही वाचा -

  1. मुंबईत बदलापूरच्या घटनेची पुनरावृत्ती, दोन अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ - Sexual harassment of minor girls
  2. 'तू मला आवडतेस...'; स्कूल व्हॅन चालकाचा विद्यार्थिनीला इंस्टा मेसेज, मनसैनिकांनी फुल्ल धुतला - School Van Driver Message Girl
  3. बलात्कार करणाऱ्या नराधमांना भर चौकात फाशी द्यावी- अण्णा हजारे - Anna Hazare News
Last Updated : Aug 25, 2024, 8:51 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details