मुंबई-अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठा शोक व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनीही तपासाची चक्रे जोरात फिरवलीत. माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील तिन्ही आरोपी कुर्ला येथील एका घरात गेल्या एक महिन्यापासून भाड्याने राहत होते, अशी धक्कादायक माहिती समोर आलीय. दरम्यान, या प्रकरणात मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक चौकशीसाठी घटनास्थळी दाखल झालंय. माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी ताब्यात असलेल्या तीन आरोपींनी कुर्ला येथे एक महिन्यापूर्वी एक घर भाड्याने घेतले होते. या घरात त्यांचे एक महिना वास्तव्य होते, अशी माहिती पोलिसांच्या हाती आलीय. वांद्रे खेरनगर येथे बाबा सिद्दिकी यांची हत्या झालेल्या घटनास्थळी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक दाखल झाले असून, चौकशी करण्यात येत आहे.
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; आरोपींचं कुर्ल्यात वास्तव्य - BABA SIDDIQUI MURDER CASE
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी ताब्यात असलेल्या तीन आरोपींनी कुर्ल्यात महिन्यापूर्वी एक घर भाड्याने घेतले होते. तिथे एक महिना वास्तव्य होते, अशी माहिती पोलिसांच्या हाती आलीय.
Published : Oct 15, 2024, 3:42 PM IST
हत्येचं कारण काय? : बाबा सिद्दिकी हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते होते. तसंच ते आमदार झिशान सिद्दिकी यांचे पिता होते. आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेरच तीन अज्ञात हल्लेखोरांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात त्यांना तीन गोळ्या लागल्या. एक गोळी छातीत लागली. तर त्यांच्या सहकाऱ्याच्या पायालादेखील एक गोळी लागली. जखमी अवस्थेत बाबा सिद्दीकी यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोर अज्ञात आहेत.
घटनास्थळावरून पिस्तूल व कागदपत्रे जप्त: दरम्यान, घटनास्थळावरून पोलिसांना पिस्तूल आणि काही कागदपत्रे मिळाली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. यासंदर्भात पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
राज यांच्यावर भाभा रुग्णालयात उपचार : या प्रकरणात राज कनोजिया या 22 वर्षीय तरुण पायाला गोळी लागून तो जखमी झाला होता. सध्या राज भाभा रुग्णालयात उपचार घेत आहे, त्याच्या पायावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आलीय. या संदर्भात बोलताना राज सांगतो की, त्यादिवशी मी देवीच्या दर्शनानंतर त्या ठिकाणाहून जात असताना मला ज्यूसवाला दिसला. मी ज्यूसवाल्याकडे थांबलो असताना अचानक फटाके फुटल्याचा आवाज आला, मला वाटलं फटाके फुटत आहेत आणि माझा पाय अचानक जड झाला. मला कळेना नेमके काय झालं, कदाचित फटाके पायावर आले असतील, असे मला वाटले. मात्र लोकांमध्ये पळापळ सुरू झाली आणि गोळीबार झाल्याची चर्चा सुरू झाली. मी तिथून लंगडत मंदिराजवळ पोहोचलो, माझ्या पायातून प्रचंड रक्त वाहत होते. मला लोकांनी ताबडतोब रुग्णालयात दाखल केले, असे राज याने सांगितलं.
हेही वाचा-