महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बाबा सिद्दीकींची हत्या करणारे आरोपी पुण्यात गोळा करायचे भंगार; आणखी एकाला अटक, पंजाब कनेक्शनही उघड - BABA SIDDIQUE MURDER CASE

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक करण्यात आली आहे.

BABA SIDDIQUE MURDER CASE
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 13, 2024, 9:55 PM IST

Updated : Oct 13, 2024, 10:43 PM IST

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी दोन जणांना अटक केली. यानंतर मुंबई पोलिसांनी आणखी एकाला पुण्यातून अटक केली आहे. त्यामुळं अटक केलेल्यांची संख्या आता तीन झाली आहे.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं केली कारवाई : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाची जबाबदारी बिष्णोई गँगनं घेतली असल्याची माहिती मिळत आहे. या गँगशी संबंधित असणाऱ्या एकाला मुंबईच्या गुन्हे शाखेनं अटक केली आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलिसांनी पुण्यातून तिसरी अटक केली आहे. प्रवीण लोणकर नावाच्या व्यक्तीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे.

तिघेही आरोपी राहत होते पुण्यात :शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकर याला पुण्यातील कर्वेनगर वारजे भागातून रविवारी सकाळी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केली. प्रवीण लोणकर यानेच हल्लेखोरांना राहण्यासाठी रूम भाड्यानं दिली होती. धर्मराज कश्यप, शिवकुमार गौतम आणि सिंग हे देखील वारजे परिसरात राहत होते. हे तिघेही स्क्रॅप गोळा करण्याचं काम करत होते आणि अनेकवेळा मुंबईला ये-जा करत होते. मुंबईत जाऊन रेकी करण्यासाठी त्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्यात आले होते. प्रवीण लोणकर देखील त्यांच्या रूमपासून काही अंतरावर राहत होता, अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

शुभम लोणकरचा भाऊ अटकेत : प्रवीण हा शुभम लोणकर याचा भाऊ असून, प्रवीण लोणकर हा कटातील एक सूत्रधार असण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांचं एक पथक पुण्यात तपासासाठी आलं आहे. या पथकानं प्रवीण लोणकर याला अटक केली आहे. त्यामुळं बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पुणे कनेक्शनही समोर येत असल्याचं दिसत आहे.

जालंधरमधील आरोपीची पटली ओळख :बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील चौथा आरोपी हा पंजाबमधील असल्याची माहिती समोर आली आहे. पंजाबच्या जालंधरमधील नकोदर येथील आकार गावातील मोहम्मद झीशान अख्तर या चौथ्या आरोपीचा सहभाग असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अख्तरला जालंधर ग्रामीण पोलिसांनी 2022 मध्ये संघटित गुन्हेगारी, खून आणि दरोड्याप्रकरणी अटक केली होती.

हल्लेखोरांना केली मदत : अख्तर बाहेरून आलेल्या तिन्ही हल्लेखोरांना डायरेक्ट करत असल्याचं समजतंय. गोळीबारावेळी हल्लेखोरांना तो सिद्दीकीच्या लोकेशनची माहिती देत होता. तिन्ही हल्लेखोरांना भाड्याच्या खोलीची व्यवस्था करण्यासह लॉजिस्टिक सहाय्यही त्यानं केलं असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबतची माहिती 'एएनआय'नं दिली.

हेही वाचा -

  1. बाबा सिद्दीकींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, बडा कबरस्तानमध्ये दफन
  2. बाबा सिद्दीकींना 'वाय' दर्जाची सुरक्षा नव्हती, पोलिसांचा खुलासा; एका आरोपीला पोलीस कोठडी
  3. जितेंद्र आव्हाडांना बिष्णोई गँगकडून धमकीचा फोन; सुरक्षा वाढवण्याची मागणी
Last Updated : Oct 13, 2024, 10:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details