मुंबई - सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराच्या रणधुमाळीत आघाडी घेतली आहे. सर्वाधिक जागांवर निवडणूक लढणाऱ्या भाजपानं प्रचाराला वेगानं सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांचा धुमधडाका आज संपूर्ण महाराष्ट्रभर होणार आहे.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला! पंतप्रधान गृहमंत्र्यांसह लोकसभेचे विरोधी पक्षनेते आज घेणार प्रचारसभा - ELECTION PRACHAR SABHA NEWS
विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्र्या यांच्यासह विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विविध मतदारसंघात प्रचार सभा आहेत.
विधानसभा निवडणूक अपडेट (Source- ETV Bharat)
Published : Nov 12, 2024, 10:57 AM IST
भाजपा नेत्यांच्या सभा-
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुपारी १२:३० वाजता चिमूर येथे विशाल जनसभा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर ३:४५ वाजता ते सोलापूर येथे सभेला संबोधित करणार आहेत. तर तर सायंकाळी ६:०० वाजता पुण्यात त्यांची विशाल जनसभा आयोजित करण्यात आली आहे.
- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज मुंबईत सभा घेणार आहे. सायंकाळी ६ मस्त घाटकोपर येथे जनरल अरुण कुमार वैद्य उद्यानामध्ये तर सायंकाळी ७:५५ वाजता सप्ताह मैदान कमल विहार स्पोर्ट्स क्लब समोर त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सकाळी देवणी, निलंगा, किल्लारी, औसा या मतदारसंघात सभा घेणार आहेत. त्यानंतर दुपारी आंबेजोगाई, केज, पाटोदा, आष्टी आणि सायंकाळी अंबड, बदनापूर, दक्षिण पश्चिम नागपूर, मध्य नागपूर या ठिकाणी सभा घेणार आहेत.
- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दुपारी २ वाजता अकोला. ३: ३० वाजता अमरावती तर सायंकाळी ६:०० वाजता नागपूर येथे सभा घेणार आहेत.
- माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या शिरपूर, उमरेड, नागपूर सेंट्रल, नागपूर पूर्व आणि नागपूर उत्तर या ठिकाणी सभा घेणार आहेत.
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डहाणू, विक्रमगड, पेण, सायन कोळीवाडा, कल्याण या ठिकाणी सभा घेणार आहेत.
- महाविकास आघाडीच्या सभा
- दुसरीकडे काँग्रेसनंसुद्धा राज्यात झंझावती प्रचार सुरू ठेवला. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आज मंगळवारी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे काँग्रेसचे उमेदवार राहुल बोंद्रे आणि खामगावचे उमेदवार राणा दिलीप सानंदा यांच्यासाठी प्रचारसभा घेणार आहेत. तसेच गोंदिया येथे काँग्रेसचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रचाराकरिता जाहीर सभा घेणार आहेत.
- दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही आज राज्यभर सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा-