महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉंग मार्चमधील 27 आशा सेविकांना उष्मा घाताचा त्रास, उपचारासाठी रुग्णालयात दाखल - 27 आशा सेविकांना उष्मा घाताचा त्रास

Asha Worker Protest : गटप्रवर्तक आणि आशा सेविका यांच्या विविध मागण्यांसाठी शहापूर ते मुंबई मंत्रालय असा लॉंग मार्च बुधवार (7 फेब्रुवारी) पासून काढण्यात आला आहे. गुरुवारी (8 फेब्रुवारी) हा लॉन्ग मार्च भिवंडीत दाखल झाला असून उन्हाच्या झळा वाढल्यानं लॉंग मार्च मधील आशा सेविकांना उष्माघाताचा त्रास झाला. या आशा स्वयंसेविकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

asha sevika in long march suffering from heatstroke admitted to hospital in thane
लॉंग मार्चमधील 27 आशा सेविकांना उष्मा घाताचा त्रास

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 8, 2024, 9:59 PM IST

लॉंग मार्चमधील 27 आशा सेविकांना उष्मा घाताचा त्रास

ठाणे Asha Worker Protest : गटप्रवर्तक आणि आशा सेविकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शेकडो महिलांनी शासनाच्या निषेधार्थ 7 ते 9 फेब्रुवारी असा लॉंग मार्च ठाणे जिह्यातील शहापूरातून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाचे अध्यक्ष एम.ए.पाटील, सरचिटणीस भगवान दवणे यांच्या मार्गदर्शनाखाली काढला आहे. सदर लॉंग मार्च गुरुवारी (8 फेब्रुवारी) दुपारी सोनाळे गावच्या हद्दीत पोहचला असता उष्माघाताने 27 आशा सेविकांची प्रकृती अचानकपणे खालावली. त्यामुळं तूर्तास रुग्णवाहिकांमधून सर्व महिलांना भिवंडीतील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.



उष्माघाताचा त्रास :मिळालेल्या माहितीनुसार 7 फेब्रुवारी रोजी गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शेकडो महिलांनी शासनाच्या निषेधार्थ शहापूर येथील विश्राम गृहातून बुधवारी सकाळी 9:30 वाजता लॉंग मार्चला सुरुवात केली. त्यानंतर दुपारी वाशिंद येथे भोजन करून विश्रामानंतर रात्री पडघ्यात वास्तव्य केले. त्यानंतर पुन्हा गुरुवारी (8 फेब्रुवारी) सकाळी 9 वाजता पदयात्रा सुरू झाली. हा लॉंग मार्च (पदयात्रा) आज भिवंडी तालुक्यातील सोनाळे येथे आला असता दुपारच्या रखरख्यात्या उन्हामुळं आशा सेविकांना उष्माघाताचा त्रास झाला.

उपचारासाठी दाखल आशा व गट प्रवर्तक महिलांची नावं :लता बाळकृष्ण दामसे, मीना ठाकरे, साधना हरड, प्रतीक्षा ठाकरे, आनंदी सोंगा, शारदा विषे, प्रतीक्षा डोहळे, सीमा भला, भक्ती राऊत, विशाखा पाटील, अंकिता किसले, संगीता लुटे, वंदना कबाडे, प्रमिला जाधव, वंदना बोरकर, आम्रपाली पंडित, प्रतिभा सूर्यवंशी, संगीता काशीकर, वंदना इंगले, पूजा कांबळे, सुनंदा जाधव, प्रियंका क्षीरसागर, माया मोरे, मनीषा पवार, कांचन म्हस्कर, इरोपा सोनवणे, ललिता रोकडे.


मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरच लॉंग मार्च थांबणार : मिळालेल्या माहितीनुसार दम लागल्यामुळं यातील 4 ते 5 महिलांची प्रकृती चिंताजनक झाली होती. त्यानंतर तात्काळ सर्व महिलांना रुग्णवाहिकांमधून भिवंडी येथील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारानंतर सर्व महिला सुस्थितीत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतरच हा लॉंग मार्च थांबणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा -

  1. Salary Increase Of Asha Worker : राज्यातील आशा सेविकांची दिवाळी गोड, भरघोस मानधन वाढीसह दिवाळीची विशेष भेट
  2. Aasha Workers Agitation : सोलापुरात आशा सेविकांचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले निवेदन
  3. अंगणवाडी व आशा सेविकांची मानधन वाढ विचाराधीन - मंत्री यशोमती ठाकूर

ABOUT THE AUTHOR

...view details