महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'नाशिक फाटा ते चांडोली एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी' - अमोल कोल्हेंनी मानले नितीन गडकरींचे आभार - MP Amol Kolhe thanked Nitin Gadkari - MP AMOL KOLHE THANKED NITIN GADKARI

MP Amol Kolhe thanked Nitin Gadkari : नाशिक फाटा ते चांडोली 30 किमीच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजूरी मिळाल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आभार मानले आहेत.

MP Amol Kolhe
अमोल कोल्हे नितीन गडकरी (Etv Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 3, 2024, 10:26 PM IST

पुणे MP Amol Kolhe thanked Nitin Gadkari :नाशिक फाटा ते चांडोली ३० किमीच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरला केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजूरी दिली आहे. या यासाठी 7 हजार 827 कोटी रुपय मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती खासदार अमोल कोल्हे दिलीय. तसंच त्यांनी याबाबत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.

अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया (ETV BHARAT Reporter)

वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका : चाकणची वाहतूक कोंडी अतिशय गंभीर तसंच चिंतेचा विषय होता. त्यामुळं खासदार डॉ. कोल्हे सातत्यानं नाशिक फाटा ते चांडोली या एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजूरी मिळावी यासाठी पाठपुरावा करीत होते. सध्या सुरू असलेल्या संसद अधिवेशनात त्यांनी केंद्रीयमंत्री गडकरी यांची भेट घेऊन तातडीनं या एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजूरी मिळावी, असा आग्रह धरला. त्यावेळी लवकरच मंजुरी देण्याचं केंद्रीयमंत्री गडकरी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार केलं. आज केंद्रीय मंत्रिमंडळाने नाशिक फाटा ते चांडोली या ३० कि.मी. लांबीच्या 8 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या 7 हजार 827 कोटी रुपायाच्या कामाला मंजूरी दिली.

"नाशिक फाटा ते चांडोली या राष्ट्रीय महामार्गासाठी गेली 3-4 वर्षापासून अनेक पातळ्यांवर लढाई लढावी लागली. सततच्या पाठपुराव्यामुळं केंद्रीयमंत्री गडकरी यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी या एलिव्हेटेड कॉरिडॉरची निविदा प्रक्रिया सुरू केली. त्यामुळं निवडणूक आचारसंहिता संपताच या एलिव्हेटेड कॉरिडॉरचं काम सुरू होईल, अशी अपेक्षा असतानाच तळेगाव चाकण शिक्रापूर आणि पुणे शिरूर हे दोन एलिव्हेटेड कॉरिडॉर महाराष्ट्र राज्य इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडं हस्तांतरीत करण्यात आले. त्यामुळं नाशिक फाटा ते चांडोली या एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या भवितव्याविषयी शंका व्यक्त करण्यात येत होत्या. अशा परिस्थितीत मी संसद अधिवेशनात केंद्रीयमंत्री गडकरी यांची भेट घेऊन कोणत्याही परिस्थितीत नाशिक फाटा ते चांडोली या एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजूरी देण्याची मागणी केली.- डॉ. अमोल कोल्हे, खासदार

मतदारांना दिलेलं आश्वासन पूर्ण करणार : आज या एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजूरी मिळाल्यामुळं माझ्या प्रयत्नांना यश मिळाल्याचा आनंद आहेच, पण त्याचबरोबर हा एलिव्हेटेड कॉरिडॉर झाल्यानंतर चाकणसह या महामार्गावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे, याचं विशेष समाधान आहे. आता तांत्रिक बाबींची लवकरात लवकर पूर्तता करुन या एलिव्हेटेड कॉरिडॉरचं काम सुरू व्हावं, यासाठी प्रत्येक टप्प्यावर मी पाठपुरावा करणार असून मतदारांना दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे, असं खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितलं.

'हे' वाचलंत का :

  1. "उद्धव ठाकरेंना हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचताना पाहून...", देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका - Fadnavis on Uddhav Thackeray
  2. गुजरातचा विकास करण्याच्या नादात फडणवीसांनी महाराष्ट्राचं वाटोळं केलं - रोहित पवार - Rohit Pawar On Devendra Fadnavis
  3. राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला; 'वर्षा' निवासस्थानी झाली बैठक, भेटीमागचं 'राज'कारण काय? - Raj Thackeray Meet CM Eknath Shinde

ABOUT THE AUTHOR

...view details