महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी थांबवा; नागपूर खंडपीठात याचिका - Anil Rathod Pleads - ANIL RATHOD PLEADS

Anil Rathod Pleads : ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. मतमोजणीला अवघे काही दिवस शिल्लक असताना यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रा. अनिल राठोड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

Anil Rathod Pleads
प्रा. अनिल राठोड (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 31, 2024, 10:33 PM IST

Updated : May 31, 2024, 11:02 PM IST

नागपूरAnil Rathod Pleads :२६ एप्रिल रोजी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदानांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती; मात्र त्यानंतर तब्बल २५ मतांचा फरक दिसत असल्याने त्यांनी राठोड यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. प्रा. अनिल राठोड यांनी समनक जनता पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली आहे. आज या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पार पडली असून खंडपीठाने संबधित निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे.

अनिल राठोड यांनी दाखल केलेल्या याचिकेविषयी बोलताना (ETV Bharat Reporter)

'या' कारणाने मतमोजणी थांबवावी :२६ एप्रिल रोजी मतदानाची प्रक्रिया आटोपल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आढावा घेऊन मतांची टक्केवारी जाहीर केली. त्यानंतर एकूण २५ मतांचा फरक आढळून आल्यामुळे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी थांबविण्यात यावी, अशी मागणी करत समनक जनता पार्टीचे उमेदवार अनिल राठोड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.


राळेगाव, वाशिम मतदारसंघात २५ मतांचा फरक :यवतमाळ-वाशिम लोकसभा निवडणुकीत २५ मतांचा फरक हा काहीतरी गडबड असल्याकडे इशारा करत असल्याचा आरोप प्रा. राठोड यांनी केला आहे. त्यांच्या नुसार वाशिम विधानसभा क्षेत्रात सुरुवातीला दोन लाख १५ हजार ९४८ मतदान केल्याचे जाहीर करण्यात आले होते; मात्र त्यानंतर काही दिवसांनी दोन लाख १५ हजार ९५३ मतदान झाल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्याचप्रमाणे राळेगाव विधानसभा क्षेत्रातून एक लाख ९३ हजार ९७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, असं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर राळेगाव विधानसभा क्षेत्रात २० मतांची वाढ करून एक लाख ९३ हजार ९९३ मतदारांनी मतदान केल्याची माहिती देण्यात आली. दोन्ही माहितीमध्ये एकूण २५ मतांचा फरक आहे.


न्यायालयाने बजावली नोटीस :अनिल राठोड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली आहे. त्यात न्यायालयाने संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस बजावून आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा :

  1. लग्नाचे आमिष दाखवून मावस बहिणीवर बलात्कार; तब्बल आठ वर्षानंतर मिळाला न्याय, भावाला १० वर्षांची शिक्षा - Sister Rape Case
  2. चंद्रपुरात राज्यातील सर्वात प्रशस्त सीईटी केंद्र; काय आहेत सीईटी केंद्राची वैशिष्ट्य? - CET Centre
  3. धंगेकरांच्या आरोपात काहीही तथ्य नाही, गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी लवकरच AI टेक्नालॉजी, मंत्री शंभूराज देसाईंची माहिती - AI Technology
Last Updated : May 31, 2024, 11:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details