मुंबई : साऊथचा सुपरस्टार यश आज 8 जानेवारीला आपला 39वा वाढदिवस साजरा करत आहे. नवीन कुमार गौर उर्फ रॉकिंग स्टार यशच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. यश गेल्या 17 वर्षांपासून भारतीय चित्रपटसृष्टीत काम करत आहे. त्यानं बॉक्स ऑफिसवर अनेक हिट चित्रपट दिली आहेत. त्याच्या हिट चित्रपटांमध्ये 'केजीएफ' हा अनेकांना पसंत पडला होता. 2018 साली प्रदर्शित झालेल्या 'केजीएफ चॅप्टर 1' चित्रपटामुळे त्याला जगभरात ओळख मिळाली. 'केजीएफ'पूर्वी यशनं अनेक चित्रपट हिट दिले आहेत, मात्र ते फक्त कन्नड चित्रपटसृष्टीपर्यंत मर्यादित होते. सध्या यशचा आगामी चित्रपट 'टॉक्सिक'च्या रिलीजची अनेकजण प्रतीक्षा करत आहेत.
'टॉक्सिक'चा टीझर रिलीज : यशनं त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक सुंदर भेट दिली आहे. त्यानं त्याचा आगामी चित्रपट 'टॉक्सिक'चा टीझर रिलीज केला आहे. यशनं 6 जानेवारी रोजी ॲक्शन ॲडव्हेंचर 'टॉक्सिक'चे पोस्टर शेअर केले होते. या पोस्टमध्ये त्यानं सांगितलं होतं की, तो त्याच्या 39व्या वाढदिवसाला चाहत्यांना सरप्राईज गिफ्ट देईल. रिलीज झालेल्या टीझरमध्ये यशचा फर्स्ट लूक दाखविण्यात आला आहे. याशिवाय तो कारमधून उतरल्यावर एका नाईट कल्बमध्ये जाताना दिसत आहे. यानंतर तो एका पोल गर्ल डान्सरबरोबर काही रोमांटिक क्षण घालवत आहे. हा टीझर पाहून अनेकजण प्रभावित झाले आहेत.
'टॉक्सिक' कधी होणार रिलीज : टीझरमध्ये यशनं क्रीम कलरच्या पोशाखावर टोपी घातलेली आहे. या लूकमध्ये तो एखाद्या माचो मॅनसारखा दिसत आहे. 'टॉक्सिक: ए डार्क फेयरीटेल'चं दिग्दर्शन गीतू मोनदास हे करत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 10 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. आता यशचा हा पॅन इंडिया चित्रपट रुपेरी पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज आहे. यश 3 वर्षापूर्वी 'केजीएफ 2' या चित्रपटामध्ये दिसला होता. यानंतर तो एकाही चित्रपटामध्ये झळकला नाही. आता या चित्रपटामधून यश पुन्हा एकदा चाहत्यांचे मनं जिंकण्यासाठी येत आहे.
हेही वाचा :