महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विरोधी पक्षातील नेत्यांचे भाजपात प्रवेश होताना नवनीत राणांना पक्षप्रवेश का नाही? खासदार अनिल बोंडे यांनी स्पष्टचं सांगितलं - नवनीत राणा भाजपा प्रवेश

Anil Bonde On Navneet Rana : अमरावतीच्या लोकसभेच्या खासदार नवनीन राणा यांच्या अनेक कार्यक्रमांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती दर्शवली आहे. त्यामुळे त्या लवकरच भाजपामध्ये प्रवेश घेतील अशी चर्चा सुरू आहे. यावर राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी माहिती दिली.

MP Dr. Anil Bonde
नवनीत राणा

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 19, 2024, 9:23 PM IST

डॉ. अनिल बोंडे हे नवनीत राणांच्या भाजपा प्रवेशाविषयी बोलताना

अमरावतीAnil Bonde On Navneet Rana : खासदार नवनीत राणा या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मदतीनं दिल्लीत पोहोचल्यात आहेत. परंतु सहा महिन्यातच त्यांनी . काँग्रेसच्या नितीमूल्यांना तिलांजली देत भाजपाशी घरोबा केला. गेल्या पाच वर्षांपासून त्या हिंदुत्वाचा अजेंडा बेफामपणे राबवत आहे. मात्र तरीही त्यांनी अद्यापही भाजपामध्ये पक्षप्रवेश का केला नाही? याविषयी "ईटीव्ही भारत"ने राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्याशी संवाद साधला.

भाजपा प्रवेशाचा योग्यवेळी निर्णय होईल:"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकासाचा सपाटा पाहून तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडं आकर्षित होऊन खासदार नवनीत राणा भाजपाच्या जवळ आल्या आहेत. त्यांनी भाजपाला पाठिंबाही दिला. हनुमान चालीसा तसेच महाशिवपुराण यासोबतच विविध धार्मिक कार्याच्या निमित्तानं त्या सर्वसामान्य जनतेशी जोडल्या गेल्या आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्या स्वतंत्रपणे निवडून आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाच्या बाबतीत भाजपा किंवा स्वत: नवनीत राणा योग्यवेळी योग्य निर्णय घेतील," अशी माहिती खासदार बोंडे यांनी दिली.

कॉंग्रेस-राष्ट्रवादीमुळे नवनीत राणा विजयी:2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या आनंद अडसूळ यांनी नवनीत राणा यांना पराभूत केलं होते. त्यावेळी नवनीत राणा यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. अडसूळ यांना 4,67,212 तर नवनीत राणा दुसऱ्या क्रमांकाची म्हणजे 3,29,280 मते मिळाली होती. 2019 ची लोकसभा निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यावेळी काँगेस आणि राष्ट्रवादीने त्यांना भक्कम पाठिंबा देत संसदेत पाठवले होते. अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असताना जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीनं आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली होती. नवनीत राणा सध्या भाजपाच्या बाजुने उभ्या आहेत. काँग्रेस आघाडीवर, शिवसेनेवर विशेषतः तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकमुळे आणि हनुमान चालीसा प्रकरणामुळे त्या प्रामुख्यानं चर्चेत राहिल्या आहेत.


भाजपाच्या तिकीटासाठी 'हे' आहेत निकष:भाजपाकडून 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी नवनीत राणा यांना तिकीट दिलं जाईल का? असं विचारलं असता डॉ. अनिल बोंडे म्हणाले की, ''पक्षाचे तिकीट देण्यासाठी काही निकष असतात. पक्षांतर्गत सर्वे होतो. काही निकष आणि सर्वे यांच्या आधारे पक्षाची उमेदवारी दिली जाते. त्यामुळे पक्ष संघटना मजबूत करणे, नरेंद्र मोदी यांच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणं हे आमचे काम आहे. त्यामुळे नवनीत राणा यांना पक्षाची उमेदवारी देईल की नाही हे, हे पक्षच ठरवणार आहे.''


  • म्हणून अशोक चव्हाण भाजपामध्ये आले :"माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काँग्रेसला कंटाळून भाजपामध्ये आलेत. काँगेसमध्ये कुठे नेतृत्व दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताचे स्वप्न चव्हाण यांना खुणावत होते. आदर्श घोटाळा प्रकरण फाईल पुन्हा उघडणार या भीतीनं ते भाजपामध्ये आले नाहीत," माहिती खासदार बोंडे यांनी यावेळी दिली.

हेही वाचा:

  1. श्रीरामाला समर्पित केला जाणार 11 टन वजनाचा लाडू; राणा दाम्पत्याचा उपक्रम
  2. खासदार नवनीत राणांनी घेतला पतंग उडवण्याचा आनंद; पतंगवर 'श्रीरामा'चा उल्लेख
  3. राणा दाम्पत्याला मोठा धक्का, हनुमान चालिसा पठण प्रकरणी न्यायालयानं याचिका फेटाळली

ABOUT THE AUTHOR

...view details