महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'अंबानींच्या लग्नात बॉम्ब...' सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टनं उडाली खळबळ, मुंबई पोलीस सतर्क - Bomb Threat in Ambani Wedding - BOMB THREAT IN AMBANI WEDDING

Anant Ambani Radhika Merchant : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाबाबत एका संशयास्पद पोस्टनंतर खळबळ उडाली आहे. या पोस्टमध्ये अंबानींच्या लग्नात बॉम्ब असल्याचं म्हटलं आहे. मुंबई पोलीस या एक्स हँडलरचा शोध घेत आहेत.

Anant Ambani-Radhika Merchant
Anant Ambani-Radhika Merchant (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 15, 2024, 10:03 AM IST

मुंबई Anant Ambani Radhika Merchant : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या जगभरात चर्चा सुरू आहेत. त्यांच्या तीन दिवसांचा शाही विवाह सोहळ्यास 12 जुलैपासून सुरुवात झाली आहे. या विवाह सोहळ्यातील अनेक कार्यक्रम सुरू आहेत. रविवारी अनंत आणि राधिकाचं रिसेप्शन पार पडलं. मात्र त्याच दरम्यान असं काही घडलं की मुंबई पोलिसांसह सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @ffsfir या वापरकर्त्यानं अंबानींच्या लग्नात बॉम्ब असल्याचं म्हटलं आहे. यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून बंदोबस्त वाढवण्यात आलाय.

धमकीमध्ये काय म्हटलंय? :सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @ffsfir या वापरकर्त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "माझ्या मनात हा विचार येत आहे की, अंबानींच्या लग्नात बॉम्बस्फोट झाला तर अर्धे जग उलटून जाईल." याच पोस्टची दखल घेत मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अद्याप कोणाताही गुन्हा दाखल केलेला नाही. उद्योगपती अनंत अंबानींच्या लग्नात बॉम्ब असल्याची पोस्ट पाहून एका वापरकर्त्यानं मुंबई पोलिसांना टॅग केलं. ही अफवा असल्याचा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे.

विवाहस्थळाभोवती सुरक्षा वाढवली :मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा 13 जुलैला पार पडला. अनंत अंबानींच्या विवाह सोहळ्यानिमित्त जिओ सेंटरमध्ये आज विशेष रिसेप्शन कार्यक्रम होणार आहे. अशा स्थितीत पोलिसांनी भव्य विवाहस्थळाच्या आसपास सुरक्षा वाढवली. पोलिसांनी ही अफवा असल्याचा अंदाज व्यक्त केला असला तरी, त्यांनी कोणताही धोका पत्करलेला नाही. जगभरातून व्हीआयपी लोक या सोहळ्याला हजेरी लावलेल्या लग्न समारंभांच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली आहे. याआधी लुकमान मोहम्मद शफी शेख आणि व्यंकटेश नरसैया आलुरी हे दोन व्यक्तीन निमंत्रण न देता अंबानींच्या शाही विवाह कार्यक्रमात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांना कार्यक्रमस्थळी असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र, पोलिसांची नोटीस दिल्यानंतर दोघांना जाण्यास परवानगी देण्यात आली.

हेही वाचा

  1. अनंत-राधिकाच्या लग्नात आलेल्या वऱ्हाडींची नीता अंबानींनी मागितली माफी; 'हे' आहे कारण - Anant Radhika Wedding
  2. अनंत अंबानींकडून शाहरूखसह खास मित्रांना महागड्या घड्याळाची भेट, किंमत जाणून तुम्हाला बसेल धक्का - Anant Radhika Wedding
  3. अनंत राधिकाच्या लग्नात दोन संशयितांची घुसखोरी; बीकेसी पोलिसांनी दाखल केले गुन्हे - Anant Radhika Wedding

ABOUT THE AUTHOR

...view details