महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महायुतीचं हेच धोरण, आपलं ठेवायचं झाकून आणि.... - अमोल कोल्हे - Amol Kolhe Criticism Mahayuti - AMOL KOLHE CRITICISM MAHAYUTI

Amol Kolhe Criticism Mahayuti : महाविकास आघाडी मुख्यमंत्री म्हणून कोणाला पुढं करेल?, याविषयी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांना विचारलं असता ते म्हणाले, "आपलं ठेवायचं झाकून आणि ..., हे महायुतीचं धोरण आहे. तिन्ही पक्ष लाडकी बहीण योजनेची वेगवेगळी नावं सांगतात. त्यांच्यातच गोंधळ आहे."

Amol Kolhe Criticism Mahayuti
अमोल कोल्हे (ETV Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 10, 2024, 9:54 PM IST

पुणेAmol Kolhe Criticism Mahayuti : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कालच दिल्ली येथे जाऊन महाविकास आघाडीच्या नेते मंडळींची भेट घेतली आहे. तसंच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांचा चेहरा पुढे केला जात आहे.

मुख्यमंत्री पदाच्या निश्चिततेवरून महायुतीवर टीका करताना खासदार अमोल कोल्हे (ETV Bharat Reporter)

महायुतीत एकवाक्यता नाही :महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांना विचारलं असता ते म्हणाले, "महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरला का? महायुतीचं हेच सुरू आहे. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. आज जर बघितलं तर 'लाडकी बहीण योजना' घेऊन महायुतीचं सरकार पुढं चाललं आहे; पण महायुतीमध्येच या योजनेवरून एकवाक्यता दिसत नाही. तिन्ही पक्ष लाडकी बहीण योजनेची वेगवेगळी नावे सांगतात. त्यांच्यातच गोंधळ आहे."

शरद पवारांचं नाव महाराष्ट्राच्या काळजात :राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीनं काढण्यात आलेली शिवस्वराज्य यात्रा पुण्यातील हडपसर येथून आयोजित करण्यात आली होती. यावेळी अमोल कोल्हे यांना शिवस्वराज्य यात्रेच्या बाबत विचारलं असता ते म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा संपूर्ण महाराष्ट्रात नेहमीच ऍक्टिव्ह मोडवर असतो. लोकसभा निवडणुकीत मायबाप जनतेनं जो विश्वास आमच्यावर दाखवला त्यामुळे ही यात्रा संपूर्ण मतदारसंघातून फिरणार आहे. सोबतच जनतेचा आशीर्वाद घेणार आहे. आज मोदीबाग येथे अनेक नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. याबाबत कोल्हे यांना विचारलं असता ते म्हणाले, "शरद पवार संवादाची दारं कायमची उघडी ठेवतात. या नेत्यांना पवार साहेबांसोबत यायचं असेल तर ही गोष्ट अधोरेखित करणारी आहे. लोकसभेत शरद पवारांचं नाव महाराष्ट्राच्या काळजात कोरलेलं आहे."

प्रकल्प गुजरातला नेताना विरोध का नाही :परमबीर सिंग यांच्याबाबत कोल्हे यांना विचारलं असता ते म्हणाले की, "जनता जाणती आहे. अचानक या गोष्टी बाहेर येतात. मग ही स्क्रिप्ट कोणी लिहिली आहे, हे जनतेला माहिती असतं." तसंच नाशिक येथील महिंद्रा प्रकल्प गुजरात येथे जात आहे. याबाबत कोल्हे यांना विचारलं असता ते म्हणाले, "महाराष्ट्रातील महायुतीचे नेते दिल्लीपतींच्या डोळ्यात डोळे घालून का बोलत नाहीत? महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला जात असताना विरोध का करत नाहीत? महायुतीच्या नेत्यांनी दिल्लीपतींना दिलेलं हे गिफ्ट आहे का?" आधीही अनेक प्रकल्प गुजरातला गेले आहेत. त्यावर देवेंद्र फडणवीस उत्तर देतात, "गुजरात म्हणजे पाकिस्तान आहे का? स्पोर्ट सिटी गुजरातला नेली. त्यांना मोठा निधी दिला; पण ऑलंपिकमध्ये पदकं आणली ती हरियाणाने. हरियाणाला फक्त दहा टक्के निधी खेळांसाठी दिला."

हेही वाचा:

  1. "मुंबईत येऊन...", मनोज जरांगे पाटलांचा राज ठाकरेंना इशारा - Manoj Jarange Patil
  2. राष्ट्रवादीच्या बॅनरवर रोहित पवारांचा फोटोच नाही, सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या... - Supriya Sule On Sharad Pawar
  3. "हा तर, चिंधीचोर नेता"; खासदार नरेश म्हस्के यांच्यावर सुषमा अंधारेंची जहरी टीका - Uddhav Thackeray

ABOUT THE AUTHOR

...view details