पुणे Amitabh Bachchan On AI : सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांनी फेस मॅपींगबद्दल चिंता व्यक्त केली. पुणे इथल्या सिम्बायोसिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये विद्यार्थ्यांना ते शनिवारी संबोधित करत होते. यावेळी त्यांनी चिप्सच नाही, तर चित्रपटाच्या एडिटींगमध्येही प्रचंड बदल झाले आहेत. चित्रपट एडीट करणाचं तंत्रज्ञान प्रचंड बदललं आहे. एआय या तंत्रज्ञानानं तर फेस मॅपींग केलं जाते. ही चिंतेची बाब आहे, त्यामुळं भविष्यात कोणाचंही फेस मॅप करून ते कधीही वापरलं जाईल, अशी चिंता बीग बी अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली.
काय म्हणाले अमिताभ बच्चन :चित्रपट उद्योगाच्या एडिटींगमध्ये प्रचंड बदल होत आहेत. याबाबत बोलताना बीग बी म्हणाले की, आता फक्त चिप्सचं नाही, तर चित्रपटाच्या एडिटींगमध्येही प्रचंड बदल झाले आहेत. नुकत्यात आलेल्या एआय तंत्रज्ञानात फेस मॅपींग करण्यात येते. आपलं संपूर्ण शरीर फेस मॅप केलं जाते. हे फेस मॅप केलेलं कधीही वापरलं जाईल, याची भीती आहे. त्यामुळं ही चिंतेची बाब आहे, अशी भीती अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली.