अकोला Bully Arrested :पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी सांगितलं की, अकोट पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी अकोला, अकोट रस्त्यावरील अकोला नाक्याच्या पुलाखाली एका लाल रंगाच्या दुचाकीसोबत दोन संशयित युवक असून त्यांच्याकडे देशी कट्टे आहेत. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी अजय तुलाराम देठे, प्रफुल्ल विनायक चव्हाण या दोघांना ताब्यात घेतले. (gangster Shubham Lonkar) पोलिसांनी त्यांच्याकडून दोन देशी पिस्तूल, एक रिकामी मॅकझीन, ९ काडतूस जप्त केली.
गुडांची कसून चौकशी केली असता त्यांनी त्यांचा मुख्य साथीदार शुभम रामेश्वर लोणकर (रा. अकोट, ह. मु. भालेकर वस्ती, वारजे, पुणे) हा असल्याचं सांगितलं. त्याचा ठावठिकाणा घेतला असता तो उज्जैन येथे असल्याचं समोर आलं. परंतु पोलीस पोहोचेपर्यंत तो पुण्यात निघून गेला होता. पोलिसांनी त्याला पुण्यातून अटक केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सिंग यांनी दिली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून यातील आरोपींची आणखी संख्या वाढण्याची शक्यता आहे.
-
व्हिडीओ कॉलवरून संभाषण:पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी गॅंगस्टर लॉरेन्स बिन्सोई सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीसोबत शुभम लोणकर हा बोलत असल्याचं त्याच्या मोबाईलवरून दिसून आलं. तसेच लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिन्सोई याच्याही तो संपर्कात आहे. त्याच्या मोबाईलवर अनेक आंतरराष्ट्रीय कॉलही असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.