पुणेAmol Kolhe Criticized Ajit Pawar :खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, हा एनडीएचा अंतर्गत मुद्दा आहे. अनेक ठिकाणी वेगळी चर्चा सुरू आहे की, कदाचित अंतर्गत धूसफूस चव्हाट्यावर येऊ नये म्हणून मंत्रिपद नाकारलं आहे. आता तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे; पण एक बाब त्यांच्याही लक्षात आली असेल की, शरद पवार यांचा हात डोक्यावर असताना मिळणारी वागणूक आणि हात नसताना मिळणारी दिल्लीतली वागणूक हे त्यांच्या लक्षात आलं असेल, असं यावेळी कोल्हे म्हणाले.
अमोल कोल्हे अजित पवारांवर टीका करताना (ETV Bharat Reporter) या कारणानं राज्यात जोरदार चर्चा सुरू :लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची एक जागा जिंकून आली आहे. अजित पवार गटाला केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्न केले जात आहे; पण त्यांना राज्यमंत्रीपद देण्यात येत होतं. पवार यांनी ते स्वीकारलं नसून आमची पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा झाली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे; पण अजित पवार यांच्या पक्षाला काल मंत्रिपद न मिळाल्यानं राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
आमदारांमध्ये परत येण्याची मानसिकता :विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या विधानावर कोल्हे यांना विचारलं असता ते म्हणाले की, गेलेले आमदार परत येण्याची त्यांची धावपळ ही स्वाभाविक आहे. ते परत येतील यापेक्षा त्यांना परत घेतील का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी राज्यात 150 पेक्षा अधिक विधानसभामध्ये पुढे आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, केंद्र सरकारपेक्षा जास्त नाराजी महायुतीबाबत जनतेमध्ये आहे. म्हणून आमदारांमध्ये परत येण्याची मानसिकता ही स्वाभाविक आहे, असं यावेळी कोल्हे म्हणाले.
हेही वाचा :
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वीकारला पदभार; पहिलीच सही केली 'या' फाईलवर, शेतकऱ्यांना मिळणार मोठा फायदा - Narendra Modi Takes Charge As PM
- "गेल्या पाच वर्षांत एक-दोन व्यक्तींनीच सरकार चालवलं"- शरद पवार - NCP Foundation Day
- राष्ट्रवादीचा 25 वा वर्धापन दिन; काँग्रेसमध्ये बंडखोरी करुन बाहेर पडलेले शरद पवार आता पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार का? - NCP 25th Anniversary