महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एवढे दिवस वरिष्ठांचं ऐकलं, आता माझं ऐका; अजित पवारांचे बारामतीकरांना भावनिक आवाहन - Sharad Pawar

Ajit Pawar News :आजपर्यंत तुम्ही वरिष्ठांचं ऐकलं. आता तुम्ही फक्त माझं ऐका, अशी टीका अजित पवारांनी शरद पवारांंचं नाव न घेता केली आहे. आपण सरकारमध्ये गेल्यामुळं अनेक प्रश्न सुटले, असं वक्तव्यदेखील अजित पवारांनी केलं आहे. ते आज बारामतीत बोलत होते.

Ajit Pawar
Ajit Pawar

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 4, 2024, 5:09 PM IST

अजित पवार यांचं भाषण

बारामती Ajit Pawar News :बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानं बारामतीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. या पार्श्वभूमीवर आज (4 फेब्रुवारी) अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी बोलताना अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर नाव न घेता टीका केली आहे. "एकीकडं अजित तुम्हाला सांगतात असं करा, दुसरीकडं वरिष्ठ सांगतात तसं करा सांगतात. मग तुम्ही कोणाचं ऐकणार? माझी तुम्हाला एकच विनंती आहे की, तुम्ही इतके दिवस वरिष्ठांचं ऐकलं, आता माझं ऐका" असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या जनतेला केलं आहे.

माझ्या विचारांचा खासदार निवडून द्या :आज अजित पवारांनी बारामती आगामी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत माझ्या विचारांचा खासदार निवडून द्या, असं आवाहनदेखील उपमुख्यमंत्री पवार यांनी केलं. बारामतीत राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी पवार यांनी हे आवाहन केलंय. "खासदार निवडणून दिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी बोलून 'मी' मतदारसंघासाठी भरीव निधी आणू शकेन. आतापर्यंत मी राज्य सरकारसाठी काम करत आलो. मात्र, आता केंद्र सरकाकडून बारामतीसह मतदारसंघातील इतर तालुक्यांसाठी निधी आणता येईल. आतापर्यंत किती आमदार, खासदार आले आणि गेले. किती आमदार-खासदार आपल्या अवतीभवती होऊन गेले? पण आमच्या अडचणीत आम्हाला कोण मदत करतंय, याचाही विचार करायला हवा", असं पवार म्हणाले.



मी उमेदवार समजून मतदान करा : "मला काही लोकांची गंमत वाटते, मी काहीना अध्यक्ष, उपाध्यक्ष केलं. करोडो रुपयांची जागा नाममात्र दरानं घेऊन दिली. कधीही कुठली अडचण येऊ दिली नाही. मात्र काय झाला माहीत नाही. त्यांचं जोरात काम चाललं आहे. काही जण मला मुंबईत भेटले. आमची चूक झाली. दादा, तुमच्याशिवाय कुणी काम करू शकत नाही, असं त्यांनी म्हटलं. काहींची तर अडचण मला समजू शकते, असेही अजित पवार म्हणाले.

  • विकासकामं करणारा खासदार आपल्याला हवा : तुमच्या विचाराचा खासदार असेल तर, विकास कामं लवकर होतील. नुसता इकडं-तिकडं न फिरता विकासकामं करणारा खासदार आपल्याला हवा आहे, असंही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटंल आहे.

हे वाचलंत का :

  1. पंतप्रधानांच्या हस्ते कोस्टल रोडचं उद्घाटन होण्यापूर्वी आदित्य ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल, काय केला आरोप?
  2. छगन भुजबळांना रामदास आठवलेंनी दिली 'RPI' प्रवेशाची ऑफर
  3. उद्धव ठाकरे परत युतीत आले तर, रामदास आठवलेंनी स्पष्टच सांगितलं काय घेणार निर्णय

ABOUT THE AUTHOR

...view details