महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अजित पवार, सुनेत्रा पवार यांनी केलं मतदान; सुप्रिया सुळेंच्या बिटकॉईन प्रकरणावर म्हणाले . . . - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

विधानसभा निवडणूक 2024 च्या मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी सहकुटुंब मतदान केलं. त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या बिटकॉईन प्रकरणावर त्यांनी भाष्य केलं.

Maharashtra Assembly Election 2024
अजित पवार, सुनेत्रा पवार यांनी केलं मतदान (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 20, 2024, 2:03 PM IST

Updated : Nov 20, 2024, 3:24 PM IST

पुणे :राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणूक 2024 आज मतदान पार पडत असून मोठ्या उत्साहात नागरिक मतदान करताना पाहायला मिळत आहे. राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदार संघात काका विरुद्ध पुतणे अशी लढत होताना पाहायला मिळत आहे. अश्यातच आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी अजित पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या बिटकॉईन प्रकरणावर भाष्य केलं.

अजित पवार यांनी केलं मतदान (Reporter)

अजित पवार यांनी केलं सहकुटुंब मतदान :उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी आज सकाळी 7 वाजता काटेवाडी येथील मतदान केंद्रात जाऊन मतदान केलं. यावेळी जय पवार यांचीही त्यांच्यासोबत उपस्थिती होती. मतदान केल्यानंतर अजित पवार यांनी माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधला.

अजित पवार, सुनेत्रा पवार यांनी केलं मतदान; सुप्रिया सुळेंच्या बिटकॉईन प्रकरणावर म्हणाले . . . (Reporter)

महाराष्ट्राची घौडदौड अशीच सुरू राहील :माध्यम प्रतिनिधींसोबत बोलताना अजित पवार म्हणाले की, "आज राज्यात 288 मतदार संघात मतदान होत असून त्या मतदार संघात योग्य उमेदवाराला राज्याच्या जनतेनं मतदान करून विजयी करावं. महाराष्ट्राची घौडदौड अशीच पुढं राहील यासाठी प्रयत्न करावा. या विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालात राज्याचं चित्र हे अतिशय सकारात्मक राहील," असं यावेळी अजित पवार म्हणाले.

सुप्रिया सुळे यांच्या बिटकॉईन प्रकरणावर म्हणाले व्हिडिओ पाहुन बोलतो :सुप्रिया सुळे यांच्यावर माजी आयपीएस अधिकाऱ्यांनी बिटकॉईन प्रकरणी आरोप केले आहेत. या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता, "त्यांनी आपण सध्या निवडणुकीच्या गडबडीत आहोत, त्यामुळे तो आरोपाचा व्हिडिओ पाहिला नाही. व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण यावर बोलू," असं त्यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितलं.

हेही वाचा :

  1. 'सरकारकडून अपेक्षा करायच्या असतील तर आधी मतदान करा'; देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन, बिटकॉईन प्रकरणी केलं मोठं भाष्य
  2. बिटकॉइन घोटाळ्याचा आरोप, काँग्रेससह सुप्रिया सुळेंची माजी आयपीएस अधिकाऱ्याविरोधात सायबर क्राईमकडं तक्रार
  3. लाइव्ह बारामतीत मतदानादरम्यान दमदाटी होत असल्याचा युगेंद्र पवार यांच्या आईचा आरोप
Last Updated : Nov 20, 2024, 3:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details