मुंबईPrakash Ambedkar Criticized PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एक्स पूर्वीचे ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे की, 'जिनिव्हास्थित इंटरनल डिस्प्लेसमेंट मॉनिटरिंग सेंटर'ने मणिपूरमधील हिंसाचारानंतर सर्वाधिक विस्थापन झाल्याचे (67,000; 2023 मध्ये दक्षिण आशियातील एकूण विस्थापनांपैकी 97%) म्हटले असून 2018 पासून भारतातील संघर्ष आणि हिंसाचारामुळे देखील एवढे विस्थापन झाले नव्हते. कदाचित, तुम्ही ही "सुपरपॉवर" वापरली नसेल. कारण, तुम्ही आणि तुमच्या गुंडांनी गुजरात आणि मणिपूरमधील हत्याकांडाला पाठबळ देऊन ते घडवून आणलं आहे.
सुपरपॉवरचा वापर का नाही :आपल्याकडे खरोखरच इतकी प्रभावी "सुपरपॉवर" आहे तर मग भारत आणि मालदीवमधील बिघडत चाललेले द्विपक्षीय संबंध वाचविण्यासाठी तुम्ही त्याचा वापर का केला नाही? चीनला आपली जमीन बळकावण्यापासून रोखण्यासाठी या "सुपरपॉवर"चा वापर का केला जात नाही? असे प्रश्नही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, स्प्रिंग रिव्हाॅल्यूशनला पाठिंबा देण्यासाठी आणि आपल्या शेजारील म्यानमारमध्ये 4000 हून अधिक निदर्शकांच्या हत्या थांबवण्यासाठी या "सुपरपॉवर"चा वापर का केला गेला नाही? इस्रायल-हमास यांच्यात शस्त्रसंधी आणि बंधकांच्या सुटकेसाठी वाटाघाटी करून हजारो जीव वाचवण्यासाठी तुम्ही सुपरपॉवरचा वापर का केला नाही? असा सवालही त्यांनी केला आहे.
घाटकोपर दुर्घटना मानवनिर्मित :घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना ही मानवनिर्मित असून, ती हत्येपेक्षा कमी नाही. या 'हत्यांना' मुंबई महापालिकेशिवाय कोणीही जबाबदार नाही, हे आपल्या सर्वांनाच माहिती असल्याचं ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. या मानवनिर्मित दुर्घटनेतील पीडितांमध्ये दोन रिक्षाचालक, एक कॅब ड्रायव्हर, एक टूरिस्ट ड्रायव्हर, एक डिलिव्हरी बॉय आणि एका पेट्रोल पंप कर्मचाऱ्याचा समावेश आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळलेला असताना मुख्यमंत्र्यांनी मदत म्हणून केवळ पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. ज्यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे, ते त्यांच्या कुटुंबाचा एकमेव आधार होते; यामध्ये काही महाराष्ट्रातील तर काही महाराष्ट्राबाहेरचे होते. ते सर्वजण आपलं घरदार सोडून चांगलं जीवन जगण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मुंबईत आले होते. होर्डिंग कोसळलं त्या ठिकाणी मी भेट दिली होती, तेव्हा मृतांच्या कुटुंबीयांना 20 लाख रुपये आणि जखमींना 10 लाख रुपये मदत देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती, असं सांगून आंबेडकर यांनी आज त्या मागणीचा पुन्हा उल्लेख केला आहे.
हेही वाचा :
- शिरुर लोकसभेच्या ईव्हीएम स्ट्रॉंग रुमच्या सीसीटीव्हीची स्क्रिन 24 तास बंद? जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले... - Lok Sabha Election
- दोन मुख्यमंत्र्यांच्या जामिनाची न संपणारी कथा; केजरीवाल यांना जामीन, हेमंत सोरेनचं काय होणार ? - The Tale of Two Bails
- लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पुन्हा जातीची गोळाबेरीज; कोणत्या मतदारसंघात कोणत्या जातीचं वर्चस्व? - Caste Equations In Mumbai