मुंबई Mahadev Betting App Case : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी १५ हजार कोटींच्या फसवणूक प्रकरणात मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकानं (एसआयटी) बॉलिवूड अभिनेता साहिल खान (Actor Sahil Khan) याची मंगळवारी दोन तास कसून चौकशी करण्यात आली. माटुंग्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांच्या तक्रारीवरून महादेव ऑनलाईन गेमिंग-बेटिंग अॅप प्रकरणात ३१ हून अधिक जणांविरोधात माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा एसआयटी तपास करत आहे.
याआधी तीन तास कसून चौकशी : एसआयटीनं याप्रकरणात अभिनेता साहिल खान याला चौकशीसाठी समन्स बजावले होते. उच्च न्यायालयानं अंतरिम दिलासा देत पोलीस तपासाला सहकार्य करण्याचं आदेश दिल्यानंतर, साहिल खान हा गेल्या शनिवारी गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाला होता. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्याची तीन तास कसून चौकशी करत जबाब नोंदविला होता.
चौकशी सुरू :एसआयटीनं साहिल खान याला पुन्हा चौकशीला बोलावलं होतं. त्यानुसार, मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास गुन्हे शाखेसमोर तो हजर झाला. त्याची दोन तास कसून चौकशी करण्यात आलीय. "द लायन बुक ॲप" नावाच्या एका ॲपमध्ये साहिल खान हा भागीदारीत असल्याच्या माहितीतून गुन्हे शाखा त्याच्याकडं चौकशी करत आहे.आज पुन्हा दोन तास चौकशी करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एसआयटीच्या चौकशीला उपस्थित राहण्याचं निर्देश देण्यात आलं होतं आणि त्यानुसार वेळोवेळी मुंबई पोलिसांना सहकार्य करणार असल्याचं साहिल खानने सांगितलं.
35 जणांविरुद्ध गुन्हा दाखल: महादेव बेटिंग ॲप प्रकरणी आतापर्यंत एकाला अटक करण्यात आलीय. मुंबई पोलिसांनी महादेव बेटिंग ॲपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर, रवी उपल, सुभम सोनी यांच्यासह 35 जणांविरुद्ध 15 हजार कोटींच्या फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केलाय.
हेही वाचा -
- महादेव बेटिंग ॲप प्रकरणी मंगळवारी मुंबई पोलीस अभिनेता साहिल खानची करणार चौकशी - Mahadev betting app case
- महादेव ॲप प्रकरण : अभिनेता साहिल खानची ३ तास झाली कसून चौकशी - Mahadev Betting App Case
- महादेव बेटिंग ॲपचं मुंबई कनेक्शन, एसआयटीने पहिल्या आरोपीला ठोकल्या बेड्या