अमरावती Firing On Bus And Truck : नागपूर येथील काही भाविक शेगावला एका खाजगी बसने दर्शनासाठी गेले होते. परत येताना अमरावती येथील श्रीअंबा देवीचं दर्शन घेऊन हे भाविक रविवारी रात्री नागपूरच्या दिशेने निघाले असताना, नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या (Nandgaon Peth Police Station) हद्दीत त्यांच्या बसचा पाठलाग करून बसवर गोळीबार (Firing Case) करण्यात आला होता. या घटनेत बस चालक जखमी झाला असताना देखील त्याने बस मधात न थांबवतात थेट तिवसा येथे थांबवला होता.
ट्रक मध्य प्रदेशात आढळून आला :खाजगी बस थांबवण्यात आरोपींना यश आलं नसताना याच मार्गावरून येणारा एक ट्रक आरोपींनी अडवला. आरोपींनी ट्रकचालकास बांधून मारहाण केली आणि ट्रक घेऊन पळ काढला होता. या घटनेमुळं एक्सप्रेस हायवेवर (Amravati Nagpur Express Highway) प्रचंड दहशत पसरली होती. नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकारातील आरोपी हे उत्तर प्रदेशचे असावेत असा अंदाज खाजगी बस चालकाने दिलेल्या माहितीवरून व्यक्त करण्यात आलाय. दरम्यान, चोरट्यांनी पळविलेला ट्रक मध्य प्रदेशात आढळून आला असून हे आरोपी उत्तर प्रदेशचे असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली आहे.