मुंबई Aaditya Thackeray Mumbai PC: मुंबईची गेल्या दोन वर्षांमध्ये प्रचंड लूट सुरू असून कंत्राटदारांच्या माध्यमातून मुंबई लुटली जात आहे. या सर्व गैरव्यवहाराची महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर चौकशी करून संबंधितांना तुरुंगात टाकले जाईल, असा इशारा शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. ते आज (29 जुलै) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
घोटाळेबाजांना तुरुंगात टाकू- ठाकरे :गेल्या दोन वर्षांमध्ये मुंबईला मोठ्या प्रमाणात लुटलं जात आहे. सर्वत्र कंत्राटदारांचे राज्य असून मुंबईत केवळ रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचा फार्स केला जात आहे. रस्त्यावरील खड्डे पोलीस बुजवत आहेत आणि कंत्राटदार मज्जा मारत आहेत अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या सर्व मुंबई महानगरपालिकेच्या पैशाची अतोनात उधळपट्टी करणाऱ्या कंत्राटदारांची आम्ही चौकशी करू. गैरकारभार असलेल्या कामांना स्थगिती देऊ आणि घोटाळेबाजांना तुरुंगात टाकू, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला आहे.