महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत तरुणीवर बलात्कार: नराधमानं गाठली अत्याचाराची परिसीमा, गुप्तांगात घातले ब्लेड आणि दगड - GIRL TORTURE RAPED IN MUMBAI

मुंबईत बेशुद्धावस्थेत तरुणी आढळल्यानं मोठी खळबळ उडाली. या तरुणीवर ऑटो चालकानं बलात्कार करुन तिच्यावर अमानुष अत्याचार केल्याचं उघड झालं.

Girl Torture Raped In Mumbai
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 24, 2025, 11:09 AM IST

Updated : Jan 24, 2025, 4:14 PM IST

मुंबई :आतापर्यंत महिला सुरक्षेच्या बाबतीत दिल्लीपेक्षा मुंबई कितीतरी पटीनं सेफ आहे, असं म्हटलं जात होतं. मात्र, आता याच्या उलट होताना दिसत आहे. मुंबईत एका रिक्षा चालकानं वीस वर्षे तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. इतकंच नाही तर, या आरोपीनं पीडित तरुणीच्या गुप्तांगात ब्लेड आणि दगड टाकल्याचं देखील वैद्यकीय तपासात समोर आलं आहे. राजरतन वालवाल असं नराधम रिक्षा चालकाचं नाव आहे. पोलिसांनी या तरुणीची वैद्यकीय तपासणी मुंबईतील केईएम रुग्णालयात केली. त्यात ही बाब समोर आली आहे. या घटनेचा अधिक तपास झोन बाराच्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील करत आहेत.

तरुणीवर बलात्कार करुन गुप्तांगात भरले ब्लेड आणि दगडं :मिळालेल्या माहितीनुसार, एक वीस वर्षाची तरुणी रात्री उशिरा राम मंदिर स्थानकाजवळ रडताना काही लोकांनी पाहिली. तिची अवस्था पाहून तिथल्या उपस्थित नागरिकांनी तत्काळ वनराई पोलीस ठाण्यात घटनेबाबतची माहिती दिली. वनराई पोलीस ठाण्याचे कर्मचारी तिथे आले, त्यांनी या तरुणीला सोबत घेतलं. पीडिता आणि तिचं कुटुंब नालासोपारा इथं राहतात. आरोपीनं वसई बीचवर पीडीतेसोबत हे कूकृत्य केल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर संबंधित रिक्षाचालकानं या तरुणीच्या गुप्तांगात सर्जरी ब्लेड आणि छोटे दगड भरले. या तरुणीला बेशुद्ध अवस्थेत राम मंदिर स्थानकाजवळ सोडून आरोपी रिक्षा चालक पसार झाला.

नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या :दरम्यान, या घटनेचा अधिक तपास झोन बाराच्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील करत आहेत. याबाबत बोलताना त्यांनी, "आरोपी रिक्षाचालक राजरतन वालवाल याला ताब्यात घेतलं. रिक्षाचालक राज रतन वालवाल याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल आला असून, या घटनेचा अधिक तपास सुरू आहे," अशी माहिती पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी दिली आहे.

पीडितेवर दोनवेळा अत्याचार? : या प्रकरणी पोलिसांनी पीडित तरुणीची चौकशी केली असता, पीडित तरुणीवर दोनवेळा अत्याचार झाल्याचं समोर आलं. मात्र, पीडित तरुणीनं सुरुवातीला पोलिसांना खोटी माहिती दिली होती. आपण अनाथ असून दोन दिवसांपूर्वी मुंबईत आले होते. त्यानंतर रिक्षानं गोरेगावला जाताना अत्याचार झाल्याचं पीडितेनं सांगितलं होतं. मात्र, तिच्या बोलण्यात तफावत आढळली आहे. पीडितेचे आई, वडील नालासोपारा परिसरात राहतात. घटनेच्या दिवशी तिचा घरच्यांसोबत वाद झाला होता.

पोलिसांकडून कसून चौकशी : या वादानंतर ती रागानं सुरुवातीला नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरात आली. इथून ती गोरेगाव परिसरात रिक्षानं गेली. यावेळी रिक्षा चालकानं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, असा आरोप पीडितेनं केलाय. यानंतर पीडित तरुणी गोरेगावच्या राममंदिर स्टेशन परिसरात बेशुद्धावस्थेत आढळली होती. हा सगळा घटनाक्रम पाहता, पीडितेवर दोनवेळा अत्याचार केल्याचा अंदाज पोलिसांकडून बांधला जातोय. पोलीस पीडितेच्या दाव्याची शाहनिशा करत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी रिक्षा चालकाला अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.

हेही वाचा :

  1. डॉक्टर तरुणी बलात्कार खून प्रकरण : संजय रॉय दोषी असल्याचं न्यायालयानं केलं जाहीर, सोमवारी ठोठावणार शिक्षा
  2. चिमुकली अत्याचार हत्या प्रकरण : तिघांना ठोकल्या बेड्या, दाढी करून पेहराव बदलताना विशाल गवळीवर पोलिसांची झडप
  3. धक्कादायक : दिराचा वाहिनीवर बलात्कार: पतीही करायचा अनैसर्गिक अत्याचार, पोलीस करणार चौकशी
Last Updated : Jan 24, 2025, 4:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details