महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतात मोटर सुरू करण्यासाठी गेलेला मूकबधीर मुलगा बंधाऱ्यात बुडाला, आईच्या डोळ्यादेखत घडली घटना - Youth Drowns In River - YOUTH DROWNS IN RIVER

Youth Drowns In River : आईच्या डोळ्यादेखत 18 वर्षाचा मुलगा माणगंगा नदीवरील बंधाऱ्यात बुडाल्याची घटना माण तालुक्यात घडली आहे. तो साताऱ्यातील मूकबधीर विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकत होता. रात्री उशीरापर्यंत त्याचा शोध लागलेला नव्हता.

Youth Drowns In River
मुलाचा शोध घेत असलेलं बचावपथक (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2024, 7:17 AM IST

सातारा Deaf Boy Drowns River : शेतातील मोटार सुरू करण्यासाठी गेलेला 18 वर्षाचा मूकबधीर मुलगा बंधाऱ्यात बुडाल्याची घटना माण तालुक्यातील म्हसवडमध्ये घडली आहे. हणमंत मोहन शेंबडे (वय 18, रा. शेंबडेवस्ती-म्हसवड) असं मृत मुलाचं नाव आहे. दुर्दैव म्हणजे ही घटना त्याच्या मूकबधीर असलेल्या आईच्या डोळ्यासमोर घडली आहे. मूकबधीर असल्यानं मुलगा आणि आईला आरडाओरडाही करता आला नाही.

मुलाचा शोध घेत असलेलं बचावपथक (Reporter)

गणेशोत्सवाच्या सुट्टीसाठी आला होता गावी :हणमंत मोहन शेंबडे हा मूकबधीर विद्यार्थी साताऱ्यातील मुकबधीर विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकत होता. गणेशोत्सवामुळे तीन चार दिवस सुट्टी असल्यानं तो गावी आला होता. रविवारी दुपारी तो आईसोबत शेतातील मोटार चालू करण्यासाठी गेला. त्याची आईसुद्धा मुकबधीर आहे. माणगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्यानं दोरखंडाच्या सहाय्यानं नदी पार केल्याशिवाय शेतात जाता येत नव्हतं.

दोरखंड निसटल्यानं पाण्यात गेला वाहून : आईला नदीच्या काठावर उभं करुन तो दोरखंडाच्या सहाय्यानं नदीपार करत होता. नदीच्या मध्यभागी गेल्यानंतर हणमंतच्या हातातून दोरखंड निसटला आणि तो नदीच्या पाण्यात वाहत गेला. मुलगा वाहून जात असल्याचं पाहून मूकबधीर आईला ओरडता देखील आलं नाही. म्हणून आईनं पळत घर गाठून वडिलांना माहिती दिली. प्रशासनाला ही माहिती कळवताच पोलीस आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडं धाव घेत पाण्यात बुडालेल्या हणमंतचा शोध सुरू केला. रात्री उशीरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता.

आमदार जयकुमार गोरेंची घटनास्थळी धाव :या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच भाजपाचे माण खटावचे आमदार जयकुमार गोरे, डीवायएसपी उज्वला गाडेकर, तहसीलदार विकास आहिर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार, मंडळाधिकारी, तलाठी घटनास्थळी दाखल झाले. आमदार गोरे यांनी बुडालेल्या मुलाचा शोध घेण्याची सूचना प्रशासनाला केली. त्यानुसार आपत्ती निवारण कक्षाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना टीम पाठवण्यास सांगण्यात आलं. सोमवारी सकाळी रेस्क्यू टीमच्या मदतीनं मुलाचा शोध घेण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा :

  1. इंद्रायणी नदीत दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; एक मित्र बुडू लागला म्हणून इतर दोघे गेले अन्... - Indrayani Drown Death News
  2. शेततळ्यात बुडून तीन चिमुकल्या मुलींचा मृत्यू; संगमनेर तालुक्यातील घटना - Three Girls Died
  3. डोळ्यादेखत भावंड नदीपात्रात बुडताना माऊलीनं दाखविलं प्रसंगावधान, नेसलेली साडी सोडून दोघांना वाचविलं! - Ahmednagar Floods News

ABOUT THE AUTHOR

...view details