महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संशयातून अल्पवयीन कबड्डीपटूची हत्या; कबड्डी प्रशिक्षकच निघाला खुनी - Thane Murder Case - THANE MURDER CASE

Thane Murder Case : ठाण्यात एका 17 वर्षीय कबड्डीपटूची तिच्या प्रशिक्षकाने गळा आवळून हत्या (Kabaddi Player Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Murder Case
तरुणीची हत्या (MH DESK)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 28, 2024, 7:14 PM IST

Updated : May 28, 2024, 7:27 PM IST

ठाणे Thane Murder Case:कबड्डीपटू असलेली आपली प्रेयसी वारंवार मोबाईल फोनवर बोलत असल्याच्या संशयानं पछाडलेल्या कबड्डीपटू प्रशिक्षकाने तिची हत्या (Kabaddi Player Murder) केल्याची घटना उघडकीस आलीय. ठाण्याच्या तरीचापाडा कोलशेत परिसरात शुक्रवारी (दि 27 मे) रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास 17 वर्षीय अल्पवयीन कबड्डीपटूतरुणीचा मृतदेह आढळला. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी सोमवार (दि 27 मे) रोजी खुनाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी कबड्डी प्रशिक्षक गणेश गंभीरराव (२३) याला नवीमुंबईच्या घणसोली भागातून ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

प्रतिक्रिया देताना पीडितेची आई (ETV Bharat Reporter)


घरी सापडला मृतदेह :मृतक अल्पवयीन मुलगी ही मिरज येथे कबड्डी खेळण्यासाठी गेली होती. तर कुटुंबातील सदस्य हे पुण्यात लग्नाला गेले होते. कबड्डी खेळून परतीच्या प्रवासात मुलीने आईला फोन केला होता. पुण्याला ये असं आईनं सांगितलं होतं. परंतु, काम असल्यानं घरी जाते असं सांगून तरुणी गुरुवारी रात्री कोलशेत परिसरातील घरी पोहचली होती. त्यानंतर शुक्रवारी (दि 24 मे) रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तरुणीचा घरात मृतदेह सापडला.

प्रेमप्रकरणात संशयातून हत्या : कापूरबावडी पोलीस ठाण्यात आकस्मिक निधनाची नोंद केलेली होती. मृतदेह हा शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जे जे रुग्णालयात नेण्यात आला. तिच्या मानेवर गळा आवळल्याच्या खुणा आढळल्यानं तरुणीचा गळा आवळून खून केल्याचं प्राथमिक तपासणीत स्पष्ट झालंय. कापूरबावडी पोलिसानी तपासाअंती सोमवार (दि 27 मे) रोजी खुनाचा गुन्हा दाखल करून गणेश गंभीरराव याला अटक केल्याची माहिती, पोलीस निरीक्षक धांडे यांनी दिली. तर अटक आरोपी हा कबड्डी प्रशिक्षक असल्याची माहिती समोर येत असून प्रेमप्रकरणातून सदरची हत्या झाल्याची चर्चा आहे.

हेही वाचा -

  1. डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला दिलासा ; रणजीत सिंह हत्या प्रकरणात उच्च न्यायालयाकडून दोषमुक्त - Ram Rahim Acquitted In Murder Case
  2. लैला खान प्रकरणी दोषी परवेज टाकला फाशीची शिक्षा, दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण ठरवत मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा - Laila Khan Murder Case
  3. पतीला पत्नीच्या चारित्र्यावर आधीच संशय, जेवणावरून उकरून काढला वाद अन् केली हत्या - Wife Murder Case Mumbai
Last Updated : May 28, 2024, 7:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details