महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातारात २३ लाख रुपये किंमतीची ११3 किलो अफूची झाडे जप्त, दोघांना अटक - शेतात अफूची लागवड

Satara Crime News : सातारा स्थानिक गुन्हे शाखेने फलटण आणि कोरेगाव तालुक्यात छापा टाकून, २३ लाख रुपये किंमतीची ११४ किलो अफूची झाडे जप्त केली आहेत. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

Satara Crime News
११४ किलो अफूची झाडे जप्त

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 5, 2024, 10:50 PM IST

सातारा Satara Crime News: सातारा जिल्ह्यात दोन ठिकाणी छापा मारून स्थानिक गुन्हे शाखेनं २३ लाख रुपये किंमतीची अफूची झाडे जप्त केली आहेत. याप्रकरणी दीपक आबा झणझणे (रा. सासवड-झणझणे, ता. फलटण आणि मधुकर शिवाजी कदम (रा. देऊर, ता. कोरेगाव) यांना अटक करण्यात आली आहे.


२३ किलो अफूची झाडे केली जप्त : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, सासवड (झणझणे) आणि देऊर येथील शेतात अफूची लागवड केली आहे. त्यानुसार देवकर यांनी आपल्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या पथकानं देऊर (ता. कोरेगाव) येथे छापा मारून ४ लाख ६७ हजार रुपये किंमतीची २३ किलो अफूची झाडे जप्त केली.


९० किलो अफूची झाडे जप्त : लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे आणि उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या पथकाने सासवड-झणझणे (ता. फलटण) येथे छापा टाकला. तसेच संशयिताच्या शेतातून १८ लाख १६ हजार रुपये किंमतीची ९० किलो अफूची झाडे जप्त केली. या दोन्ही घटनेतील संशयितांवर गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा नोंद केला आहे.

अंमली पदार्थ जप्त: स्थानिक गुन्हे शाखेने नोव्हेंबर २०२२ पासून गांजा, गांजाची झाडे आणि अफूची या अंमली पदार्थ विरोधी एकूण ११ कारवाया करुन १ कोटी ८७ लाख ७७ हजार रुपये किमतीचा ७७५ किलो ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक ऑंचल दलाल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरूण देवकर आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले.

हेही वाचा -

  1. पुण्यातून अपहरण झालेल्या मुलाची साताऱ्यात सुटका; 70 लाखांच्या खंडणीसाठी केलं होतं अपहरण
  2. साताऱ्यात डॉल्बीवाल्यांचा धिंगाणा; पिस्तूल, कोयता, तलवारी नाचवत माजवली दहशत
  3. Satara Crime News: तीन राज्यात घरफोड्या करणारी केटीएम गॅंग जेरबंद; गुजरातमध्ये गहाण ठेवलेले १०३ तोळे सोने, ६ किलो चांदी हस्तगत

ABOUT THE AUTHOR

...view details