शिर्डी (अहिल्यानगर) Zaheer Khan Visits Shirdi : भारताचा माजी दिग्गज डावखुरा वेगवान गोलंदाज मुळचा शिर्डी जवळील श्रीरामपूर येथील रहिवासी असलेल्या झहीर खाननं आज पत्नी सागरिकासह शिर्डीत येत साई समाधीचं दर्शन घेतलं. यानंतर त्यानं माध्यमांशी बोलताना आपल्या लहाणपणींच्या आठवणींना उजाळा दिला.
मंदिर समितीकडून झहीरचा सत्कार : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहारात लहानसा मोठा झालेल्या झहीरनं क्रिकेट विश्वात आपलं नाव कमावलं. लहान पणापासूनच त्याचे वडील त्याला साई दर्शनासाठी घेवुन येत असे, यानंतर त्यानं आज अनेक दिवसानंतर आपली पत्नी सागरिका हिच्या समवेत शिर्डीला येत साईंच्या समाधीचं दर्शन घेतलं. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं मंदिर प्रमुख विष्णु थोरात व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके यांनी त्याचा शाल व साईंची मुर्ती देवून सत्कार केला. यावेळी साईबाबा संस्थानचे संरक्षण अधिकारी रोहीदास माळी उपस्थित होते.
झहीर खान साईचरणी लीन (ETV Bharat Reporter) काय म्हणाला झहीर खान : साईदर्शनानंतर माध्यमांशी बोलताना झहीर म्हणाला, "मी इथलाच भूमीपुत्र आहे. या भूमिच्या जुण्या आठवणी मनात आहेत. आज बऱ्याच दिवसांनी शिर्डीला येण्याचा योग आला. सर्वांच्या कल्यानासाठी साईकडे प्रार्थना केली." राजस्थानच्या मुलीचा बॉलिंग करतानाचा व्हायरल झालेल्या व्हिडिओवर बोलतांना झहीरनं त्या मुलीचं कैतुक करत तीच्यात टँलेट असल्याचं सांगितलं. तसंच तीनं चांगली मेहनत केली तर ती नक्कीच नाव कमावेलं असंही त्यानं म्हटलंय. त्याचप्रमाणे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळेची भेट झाली का यावर बोलणं मात्र झहीरनं टाळलं.
झहीर खान साईचरणी लीन (ETV Bharat Reporter)
भारतीय क्रिकेटसाठी चांगलं वातावरण : सचिननं एका मुलीचा गेंदबाजी करतांनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करतांना तीची तुलना झहीरशी केली होती. त्यावर बोलतांना झहीरनं त्या मुलीची बॉलिंग अँक्शन माझ्या सारखीच आहे. ही चांगली बाब असल्याचं म्हटलंय. तसंच तीचं टँलेट चांगलं आहे व आपल्या देशात टॅलेंटला प्रोत्साहन मिळतं. मेहनत करुन पुढं जाता येतं, भारतात क्रिकेटसाठी चांगल वातावरण असल्याचंही त्यानं म्हटलंय.
हेही वाचा :
- Boxing Day Test: पहिल्या दिवशी कांगारुंच्या 4 फलंदाजांची 'फिफ्टी'; शेवटच्या सत्रात भारताचं पुनरागमन
- माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी रुग्णालयात दाखल; प्रकृती बरी नसल्याचा व्हिडिओ पाहताच, 'फॅन' डॉक्टरांनी केले मोफत उपचार