महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारताला 440 व्होल्टचा झटका...! - WTC POINT TABLE

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा कसोटी सामना गमावल्यानंतर भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठं नुकसान झालं असून गुणतालिकेतील पहिलं स्थान गमावावं लागलं आहे.

WTC Point Table
भारताला 440 व्होल्टचा झटका (ETV Bharat, ICC)

By ETV Bharat Sports Team

Published : Dec 8, 2024, 12:06 PM IST

ॲडलेड WTC Point Table : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघानं दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा 10 गडी राखून पराभव करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यात भारताचे फलंदाज खराब फ्लॉप ठरले. भारताच्या फलंदाजीत रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल सारखे फलंदाज आहेत. भारतीय संघानं पहिल्या डावात 180 धावा तर दुसऱ्या डावात केवळ 175 धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 337 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. भारतानं ऑस्ट्रेलियाला केवळ 19 धावांचं लक्ष्य दिलं, जे ऑस्ट्रेलियानं सहज गाठलं.

ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या क्रमांकावर :भारताविरुद्धचा दुसरा सामना जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला असून दोन स्थानांचा फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलियानं एकूण 14 सामने खेळले आहेत, त्यापैकी 9 जिंकले आहेत आणि त्यांचं पीसीटी 60.71 आहे. दुसरीकडे, भारतीय संघाला पराभवाचा फटका सहन करावा लागला आहे. भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. भारतीय संघानं आतापर्यंत 16 सामने खेळले आहेत, त्यापैकी 9 जिंकले आहेत आणि 6 गमावले आहेत. त्यांची पीसीटी 57.29 आहे.

अंतिम फेरी गाठण्याची आशा कायम :वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पुढील वर्षी जूनमध्ये लॉर्ड्सवर खेळवला जाईल. गुणतालिकेत अव्वल 2 मध्ये स्थान मिळवणारे दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. भारतीय संघाला अजूनही अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. भारतीय संघाकडे अजून तीन कसोटी सामने बाकी आहेत, जे फक्त ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचे आहेत.

नितीश रेड्डी सर्वात यशस्वी भारतीय फलंदाज : पिंक बॉलच्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत आणि ते फ्लॉप झाले. नितीश रेड्डीनं दोन्ही डावात भारताकडून सर्वाधिक 42-42 धावा केल्या. पण बाकीचे खेळाडू त्याला साथ देण्यात अपयशी ठरले. याच कारणामुळं टीम इंडियाला दोन्ही डावात 200 धावांचा टप्पाही पार करता आला नाही. तिसऱ्या दिवशी भारत ऑस्ट्रेलियाला टक्कर देईल, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. पण हे होऊ शकलं नाही.

हेही वाचा :

  1. ॲडलेडमध्ये पुन्हा फसली टीम इंडिया... 'डे-नाईट' कसोटीत अडीच दिवसांत कांगारुंकडून पराभव
  2. भारताला 'व्हाईटवॉश' करणाऱ्या कीवींचा 'साहेबां'कडून सफाया; 16 वर्षांनंतर मानहानिकारक पराभव
  3. कुठुन येते इतकी कन्सिस्टंटन्सी...? 'कीवीं'विरुद्ध शतक झळकावत रुटनं केला महापराक्रम

ABOUT THE AUTHOR

...view details