नवी दिल्ली Vinesh Phogat Bajrang Punia Joined Congress : कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया शुक्रवारी अधिकृतपणे काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. नवी दिल्ली येथील कॉंग्रेस मुख्यालयात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत या दोघांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षात प्रवेश करण्यापूर्वी दोघेही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी पोहोचत त्यांची भेट घेतली. यावेळी पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल हेही खरगे यांच्या निवासस्थानी उपस्थित आहेत. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर विनेश आणि बजरंग आता कुस्तीच्या आखाड्यातून राजकीय मैदानात दिसणार आहेत. हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी हे दोन्ही खेळाडू काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
लाखो रुपयांची नोकरी सोडली : तत्पुर्वी विनेश फोगटनं एक मोठा निर्णय घेत सरकारी नोकरी सोडली. शुक्रवारी विनेश फोगटनं सरकारी नोकरी सोडण्याची घोषणा केली. त्यांनी आपला राजीनामा सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. विनेश फोगट ही उत्तर रेल्वेत नोकरी करत होती. ती विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून तैनात होती. रेल्वेची नोकरी सोडताना विनेश फोगटनं लिहिलं की, 'भारतीय रेल्वेची सेवा हा माझ्या आयुष्यातील संस्मरणीय आणि अभिमानास्पद काळ आहे. मी रेल्वे सेवेपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे आणि माझं राजीनामा पत्र त्यांना सादर केलं आहे. देशाच्या सेवेत रेल्वेनं मला दिलेल्या या संधीबद्दल मी भारतीय रेल्वे परिवाराची सदैव ऋणी राहीन.'