अल अमेरत IND A vs PAK Shaheens Liev Streaming : भारत अ राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान अ राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात ACC पुरुष T20 इमर्जिंग टीम्स आशिया चषक 2024 चा चौथा सामना आज 19 ऑक्टोबर (शनिवार) रोजी अल अमेरत क्रिकेट मैदान, मंत्रालय टर्फ इथं खेळवला जाईल. ACC पुरुषांच्या उदयोन्मुख आशिया चषक स्पर्धेत आशिया खंडातील आठ संघ सहभागी होणार आहेत. आशियाई क्रिकेट परिषद (ACC) द्वारे आयोजित, ही स्पर्धा युवा आणि उदयोन्मुख खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ प्रदान करते.
तिलक वर्मा करणार भारताचं नेतृत्त्व : रमणदीप सिंग, नेहल वढेरा, अभिषेक शर्मा, आयुष बडोनी, अनुज रावत, साई किशोर आणि राहुल चहर हे स्टार खेळाडूंनी भरलेल्या भारत अ संघाचं नेतृत्व करताना तिलक वर्मा दिसणार आहेत. तर पाकिस्तान अ संघाचं नेतृत्व त्यांचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद हॅरिस करणार आहे. या संघात वेगवान गोलंदाज जमान खान आणि शाहनवाज डहानी यांचाही समावेश आहे. 2023 मधील स्पर्धेच्या मागील आवृत्तीत, भारत अ नं गट टप्प्यात पाकिस्तान अ संघाचा आठ गडी राखून पराभव केला होता, परंतु अंतिम फेरीत पाकिस्ताननं भारताचा 128 धावांनी पराभव केला होता.
स्पर्धेत किती संघ सहभागी : यावेळी इमर्जिंग आशिया चषक T20 फॉरमॅटमध्ये खेळवला जात आहे, ज्यात भारत आणि पाकिस्तानच्या अ संघांव्यतिरिक्त हाँगकाँग, ओमान, अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि यूएईचे संघही सहभागी होत आहेत. यावेळी भारतीय अ संघाला स्पर्धेत अ गटात स्थान मिळालं असून त्यात पाकिस्तान व्यतिरिक्त यूएई आणि ओमानचे संघही सहभागी आहेत.
भारत A विरुद्ध पाकिस्तान A इमर्जिंग टीम्स आशिया कप सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?
भारत अ राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान अ राष्ट्रीय क्रिकेट संघ इमर्जिंग टीम्स आशिया चषकाचा चौथा सामना 19 ऑक्टोबर (शनिवार) रोजी अल अमेरत क्रिकेट ग्राउंड, मंत्रालय टर्फ 1, अल अमेरत इथं भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:00 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक संध्याकाळी 06.30 वाजता होईल.
भारत A विरुद्ध पाकिस्तान A आशिया कपचं थेट प्रक्षेपण कुठं पहावं?