महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'साहेबां'चा संघ 7 वर्षांनंतर करेबियन देशात मालिका जिंकणार? निर्णायक अंतिम सामना भारतात 'इथं' दिसेल लाईव्ह - WI VS ENG 3RD ODI LIVE IN INDIA

वेस्ट इंडिज आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. यातील तिसरा आणि अंतिम सामना आज खेळवला जाणार आहे.

WI vs ENG 3rd ODI Live Streaming
इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज (AP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Nov 6, 2024, 7:30 AM IST

बार्बाडोस WI vs ENG 3rd ODI Live Streaming : वेस्ट इंडिज राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तिसरा आणि अंतिम वनडे सामना आज म्हणजेच 6 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस इथं होणार आहे. यापुर्वी इंग्लंडनं वेस्ट इंडिजविरुद्ध 2017 मध्ये शेवटची मालिका जिंकली होती. आता ही मालिका जिंकत इंग्लंडचा संघ इतिहास रचण्याच्या प्रयत्नात असेल.

मालिका संध्या 1-1 नं बरोबरीत : तीन सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. पहिल्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजनं इंग्लंडचा 8 गडी राखून पराभव केला. तर दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडनं दमदार पुनरागमन करत वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव केला. अशा स्थितीत तिसरा वनडे सामना जिंकून मालिका काबीज करण्यावर दोन्ही संघांचं लक्ष असेल. तिसऱ्या वनडे सामन्यात दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.

खेळपट्टी कशी असेल : बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमच्या खेळपट्टीवर चेंडू आणि बॅटमध्ये समान स्पर्धा पाहायला मिळते. या मैदानावर वेगवान गोलंदाजांना बाऊन्ससह चेंडू स्विंग करण्याची संधी मिळते. त्याचबरोबर मधल्या षटकांमध्ये फिरकीपटूंनाही या खेळपट्टीची मदत मिळते. नाणेफेक जिंकणारा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवरील वनडे सामन्यांची आकडेवारी :

मीडिया रिपोर्ट्सनुसार, केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर आतापर्यंत एकूण 52 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. ज्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं 22 वेळा विजय मिळवला आहे, तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघानं 28 वेळा विजय मिळवला आहे. तर दोन सामने अनिर्णित राहिले आहेत.

  • केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या : 226
  • केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या : 197

इंग्लंडनं केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर सर्वाधिक सांघिक धावसंख्या केली आहे. इंग्लंडनं 20 फेब्रुवारी 2019 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध 8 गडी गमावून 360 धावा केल्या. याशिवाय या मैदानावर आयर्लंडनं सर्वात कमी धावा केल्या आहेत. 2007 साली आयर्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या 91 धावांत गारद झाला होता.

मालिकेचं वेळापत्रक :

  • पहिला वनडे : 31 ऑक्टोबर (वेस्ट इंडिज 8 विकेटनं विजयी)
  • दुसरा वनडे : 2 नोव्हेंबर (इंग्लंड 5 विकेटनं विजयी)
  • तिसरा वनडे : आज

दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : वेस्ट इंडिज आणि इंग्लंड संघ वनडेमध्ये आतापर्यंत 107 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यात इंग्लंडचा वरचष्मा दिसत आहे. इंग्लंडनं 107 पैकी 54 सामने जिंकले आहेत. तर वेस्ट इंडिजनं 47 सामने जिंकले आहेत. याशिवाय 6 सामने अनिर्णित राहिले आहेत. यावरुन हे स्पष्ट होतं की जेव्हा जेव्हा दोन्ही संघ एकमेकांशी भिडतात तेव्हा चुरशीचा सामना होतो. मात्र, इंग्लंडचा रेकॉर्ड चांगला असल्यानं ते अधिक मजबूत दिसत आहेत. दोन्ही संघांमध्ये वेस्ट इंडिजच्या भूमीवर 49 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत कॅरेबियन संघानं 26 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर इंग्लंडनं 19 सामने जिंकले असून 4 सामने अनिर्णित राहिले आहेत.

वनडे मालिकेत कशी कामगिरी : वनडे मालिकेतील वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील सामना बरोबरीत सुटला आहे. आतापर्यंत इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात एकूण 22 वनडे मालिका खेळल्या गेल्या आहेत. या कालावधीत दोन्ही संघांनी 9-9 मालिका जिंकल्या आहेत. याशिवाय 4 मालिका अनिर्णित राहिल्या आहेत. घरच्या मैदानावर खेळताना वेस्ट इंडिजनं इंग्लंडला 6 वनडे मालिकेत पराभूत केलं आहे. तर 3 मालिकेत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. याशिवाय 2 मालिका अनिर्णित राहिल्या आहेत.

वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड तिसरा वनडे सामना कधी आणि कुठं खेळला जाईल?

वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा वनडे सामना आज 06 नोव्हेंबर (बुधवार) रोजी केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस इथं भारतीय वेळेनुसार रात्री 11:30 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक रात्री 11:00 वाजता होईल.

वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या वनडे सामन्याचं थेट प्रक्षेपण किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं आणि कसं पहावं?

वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेच्या भारतातील प्रसारणाबाबत सध्या कोणत्याही टीव्ही चॅनेलवर कोणतीही माहिती उपलब्ध नाही. तथापि, भारतातील या मालिकेचं लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर पाहता येईल.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 :

इंग्लंड :फिल सॉल्ट (यष्टिरक्षक), विल जॅक, जॉर्डन कॉक्स, जेकब बेथेल, लियाम लिव्हिंगस्टोन (कर्णधार), सॅम कुरन, डॅन मौसले, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, जोफ्रा आर्चर, साकिब महमूद.

वेस्ट इंडिज : ब्रँडन किंग, एविन लुईस, केसी कार्टी, शाई होप (कर्णधार/ यष्टिरक्षक), शिमरॉन हेटमायर, शेरफेन रदरफोर्ड, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, गुडाकेश मोती, अल्झारी जोसेफ, जेडेन सील्स.

हेही वाचा :

  1. पाकिस्तानविरुद्ध त्रिशतक झळकावणारा फलंदाज संघाबाहेर; 'या' खेळाडूचं इंग्लंड संघात पुनरागमन
  2. भारताविरुद्ध 'क्लीन स्वीप' करणाऱ्या कर्णधाराला संघात स्थान नाही; नव्या कॅप्टनसह न्यूझीलंडचा संघ जाहीर

ABOUT THE AUTHOR

...view details