महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

दुलीप ट्रॉफीच्या संघांची घोषणा; मराठमोळ्या ऋतुराजच्या खांद्यावर एका संघाची जबाबदारी, आदित्य ठाकरेही उतरणार मैदानात - Duleep Trophy Squad - DULEEP TROPHY SQUAD

Duleep Trophy 2024-25 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीसाठी चारही संघांचे संघ जाहीर केले आहेत. यात कोहली आणि रोहितचं नाव नाही. (Duleep Trophy 2024 Squad)

Duleep Trophy 2024-25
रोहित शर्मा आणि विराट कोहली (IANS Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 14, 2024, 5:31 PM IST

Updated : Aug 14, 2024, 7:12 PM IST

मुंबई Duleep Trophy 2024-25 : विराट कोहली आणि रोहित शर्मा सप्टेंबरमध्ये होणाऱ्या देशांतर्गत स्पर्धेच्या दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीत खेळताना दिसणार नाहीत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीसाठी चारही संघांचे संघ जाहीर केले आहेत. यामध्ये कोहली आणि रोहितची नावं नाहीत. भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या सूचनेनुसार कोहली आणि रोहित ही स्पर्धा खेळू शकतात, असं पूर्वीचं वृत्त होतं. मात्र त्यांचं नाव संघात नाही. याशिवाय वेगवान गोलंदाज अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचीही नावं संघात नाहीत. विशेष म्हणजे या स्पर्धेत टीम डी कडून विदर्भातील आदित्य ठाकरेही मैदानात उतरणार आहे. (What is Duleep Trophy)

इशान किशनलाही संघात प्रवेश करण्याची संधी : तसंच यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला भारतीय संघात प्रवेश करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. ईशानची दुलीप ट्रॉफीसाठी टीम-डीमध्ये निवड झाली आहे. या संघाचं कर्णधारपद श्रेयस अय्यरच्या हाती आहे. टीम-अ चं कर्णधारपद शुभमन गिलकडे, (Team A vs Team B) टीम-बी ची कमान अभिमन्यू ईश्वरनकडे (Abhimanyu Easwaran) आणि टीम-सीचं कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आले आहे. ही दुलीप ट्रॉफी स्पर्धा 5 सप्टेंबरपासून खेळवली जाणार आहे. (Duleep Trophy Format)

दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीसाठी चारही संघ :

  • टीम अ : शुभमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, रायन पराग, ध्रुव जुरेल, केएल राहुल, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, प्रसीध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, विद्वत कवेरप्पा, कुमार कुशाग्रा , शास्वत रावत.
  • टीम बी : अभिमन्यू इसवरन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत, मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी*, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चहर, आर साई किशोर, मोहित अवस्थी , एन जगदीसन (यष्टीरक्षक).
  • संघ सी : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, बाबा इंद्रजीत, हृतिक शौकीन, मानव सुथार, उमरान मलिक, वैशाक विजयकुमार, अंशुल कंबोज, हिमांशू चौहान, अरमान मार्कन, अरमान चौहान. (विकेटकीपर), संदीप वॉरियर.
  • टीम डी : श्रेयस अय्यर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, इशान किशन (यष्टीरक्षक), रिकी भुई, सरांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेनगुप्ता, केएस भगत (विकेटकीपर), सौरभ कुमार.

हेही वाचा :

  1. गौतमची 'गंभीर' मागणी पूर्ण; 'हा' खेळाडू असेल भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक, पाकिस्तानच्या संघासोबतही केलं आहे काम - Team India Bowling Coach
  2. आयसीसी क्रमवारीत मोठा फेरबदल; उपकर्णधाराला मागे टाकत 'हिटमॅन'ची झेप, कोहलीही पोहोचला 'या' स्थानावर - ICC Rankings
Last Updated : Aug 14, 2024, 7:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details