महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विराट कोहली जगातील सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेटपटू; कुठून कमावतो कोट्यवधी रुपये? - Virat Kohli Net Worth

Virat Kohli Net Worth : जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली असून, यात फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो अव्वल स्थानावर आहे. टॉप-10 खेळाडूंपैकी बहुतेक फुटबॉलपटू आणि बास्केटबॉल खेळाडू आहेत. यात विराट कोहली हा एकमेव क्रिकेटपटू आहे.

Virat Kohli Net Worth
विराट कोहली (IANS Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 7, 2024, 7:12 AM IST

नवी दिल्ली Virat Kohli Net Worth : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीची गणना जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंमध्ये केली जाते. खासकरुन जर आपण क्रिकेटपटूंबद्दल बोललो तर सध्याच्या युगात त्याच्यापेक्षा जास्त 'नेट वर्थ' कोणाचीच नाही. क्रिकेटच्या मैदानात आणि मैदानाबाहेर सर्वाधिक कमाई करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये तो अव्वल स्थानावर आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. कारण गेल्या 12 महिन्यांत कोहलीनं जगभरातील क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक कमाई केली आहे.

सर्वाधिक कमावणारा क्रिकेटपटू : स्टॅटिस्टाच्या अहवालानुसार, माजी भारतीय कर्णधाराचं गेल्या 12 महिन्यांत उत्पन्न 847 कोटी रुपये होतं. तरीही सर्वाधिक कमाईच्या बाबतीत तो नवव्या क्रमांकावर राहिला. या यादीत सर्वात वर पोर्तुगालचा सुपरस्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो आहे, ज्याची कमाई 2081 कोटी रुपये आहे. स्टॅटिस्टाच्या ताज्या अहवालात गेल्या 12 महिन्यांत सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. जगभरातील महान खेळाडूंनी भरलेल्या या यादीत विराट कोहली हा एकमेव क्रिकेटर टॉप-10 मध्ये आहे. या यादीत 1 सप्टेंबर 2023 ते 1 सप्टेंबर 2024 या कालावधीतील कमाईचा समावेश आहे आणि त्यातील बहुतांश खेळाडू फुटबॉलपटू आणि बास्केटबॉल खेळाडू आहेत.

कोहलीचे उत्पन्नाचे स्त्रोत काय :विराटकडे उत्पन्नाचे अनेक स्त्रोत आहेत. तो अजूनही बीसीसीआयच्या केंद्रीय कराराच्या सर्वोच्च श्रेणीत समाविष्ट आहे. जिथं त्याला वर्षाला 7 कोटी रुपये मिळतात. त्यानंतर त्याला वर्षभर कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 सामने खेळण्यासाठी वेगवेगळी फी देखील मिळते आणि त्यातूनही त्याला सुमारे 1 ते 1.5 कोटी रुपये मिळतात. याशिवाय आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्रत्येक मोसमात कोहलीला 15 कोटी रुपये देते. क्रिकेट क्षेत्रातील या कमाईनंतर, त्याचं खरे उत्पन्न वेगवेगळ्या ब्रँड एंडोर्समेंटमधून येतं, ज्यात अनेक देशी-विदेशी कंपन्यांचा समावेश आहे.

66 कोटी रुपये भरला कर :इतकंच नाही तर कोहली स्वतः अनेक कंपन्यांचा मालक किंवा शेअरहोल्डर आहे. नुकतंच हे देखील उघड झालं की कोहलीनं गेल्या आर्थिक वर्षात एकूण 66 कोटी रुपये आयकर भरला आहे, जो भारतातील कोणत्याही खेळाडूसाठी सर्वाधिक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वयाच्या 35व्या वर्षी आणि T20 इंटरनॅशनलमधून निवृत्ती घेतल्यानंतरही कोहलीच्या कमाईत आणि ब्रँड व्हॅल्यूमध्ये कोणतीही घट झालेली नाही.

सर्वाधिक कमाई करणारे जगतील अव्वल 10 खेळाडू :

  • क्रिस्टियानो रोनाल्डो (फुटबॉल) : 2081 कोटी
  • जॉन रॉड्रिग्ज (गोल्फ) : 1712 कोटी
  • लिओनेल मेस्सी (फुटबॉल) : 1074 कोटी
  • लेब्रॉन जेम्स (बास्केटबॉल) : 990 कोटी
  • कायलियन एमबाप्पे (फुटबॉल) : 881 कोटी
  • जियानिस एंटेटोकोउनम्पो (बास्केटबॉल) : 873 कोटी
  • नेमार जूनियर (फुटबॉल) : 864 कोटी
  • करीम बेंझेमा (फुटबॉल) : 864 कोटी
  • विराट कोहली (क्रिकेट) : 847 कोटी
  • स्टीफन करी (बास्केटबॉल) : 831 कोटी

हेही वाचा :

  1. कार, बस, रेल्वेनं नव्हे तर स्वतःच्या 'प्रायव्हेट जेट'नं प्रवास करतात देशातील 'हे' दिग्गज क्रिकेटपटू - Indian Cricketers Private Jet
  2. विराट कोहलीकडे आहेत महागडी घड्याळं; किंमत बघून डोळे होतील पांढरे - Virat Kohli

ABOUT THE AUTHOR

...view details