महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विराट-बाबर-रोहित खेळणार एकाच संघात... जय शाह जागतिक 'क्रिकेटचे बॉस' होताच ICC मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत - Virat Babar in One Team

India Pakistan Players in One Team : दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांना नेहमीच भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमधील सामना पाहायचा असतो, पण दोन्ही देशांचे खेळाडू एकाच संघाकडून खेळताना दिसले तर? हे लवकरच होऊ शकतं.

India Pakistan Players in One Team
विराट-बाबर-रोहित खेळणार एकाच संघात (ANI Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 13, 2024, 4:04 PM IST

Updated : Sep 13, 2024, 4:36 PM IST

नवी दिल्ली India Pakistan Players in One Team : भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी देश आहेत. जेव्हा दोन्ही संघांमध्ये क्रिकेटचा सामना खेळला जातो तेव्हा दोन्ही बाजूंचे चाहते महागडे तिकीट खरेदी करण्यासही तयार असतात. काही चाहते पैसे नसतानाही त्यांच्या मौल्यवान वस्तू देतात. पण भारताला पाकिस्तान सामन्याच्या प्रत्येक क्षणाचं चाहत्यांना साक्षीदार व्हायचं असतं.

कसे दिसणार एका संघात : पण, दोन्ही संघांचे खेळाडू एका संघात एकत्र खेळले आणि दुसऱ्या संघांना पराभूत केलं तर काय होईल? होय, याआधीही असं घडलं आहे आणि लवकरच चाहत्यांना असं पुन्हा एकदा पाहायला मिळेल. एका वृत्तानुसार, भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेटपटू एकत्रितपणे एक स्वप्नवत प्लेइंग इलेव्हन तयार करु शकतात. कारण क्रिकेट बॉडी स्टार-स्टेटेड आफ्रो-आशिया कप परत आणण्याच्या शक्यतेवर विचार करत आहे.

2008 पासून स्पर्धा बंद : आफ्रो-आशिया चषक 2005 आणि 2007 मध्ये देखील खेळला गेला ज्यामध्ये दोन संघांचा समावेश होता. एशिया इलेव्हन ज्यात आशिया उपखंडातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटूंचा समावेश होता. ही स्पर्धा दोन वर्षे खेळवली गेली पण 2008 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं ही स्पर्धा पुन्हा खेळवता आली नाही. मात्र, दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध मालिका खेळल्या आहेत.

पुन्हा स्पर्धा घेण्याचा विचार : एका वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार, आफ्रिकन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष समोद दामोदर यांनी या संदर्भात एक अपडेट दिले. ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की, ही कल्पना यशस्वी होईल की नाही यावर पुन्हा एकदा विचार केला जात आहे. फोर्ब्सच्या अहवालात दामोदर म्हणाले, 'व्यक्तिशः मला हे (आफ्रो-आशिया चषक) झालं नाही याचे खूप दुःख आहे. मात्र, यावर फेरविचार केला जात आहे. हे आफ्रिकेनं पुढं नेलं पाहिजे.

एका संघात खेळणार बाबर-विराट : जर हा प्रस्ताव यशस्वी झाला तर शक्यतो 2025 मध्ये भारतीय आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू एकत्र खेळताना दिसू शकतात. असं झालं तर विराट कोहली, बाबर आझम, जसप्रीत बुमराह, शाहीन आफ्रिदी, रोहित शर्मा, मोहम्मद रिझवान हे हाय-बाय करत विकेट सेलिब्रेट करताना दिसू शकतात. यापूर्वी 2005 च्या पहिल्या आफ्रो-आशिया चषकात वीरेंद्र सेहवाग, शाहिद आफ्रिदी, कुमार संगकारा, महेला जयवर्धने, इंझमाम-उल-हक, आशिष नेहरा, झहीर खान आणि शोएब अख्तर या खेळाडूंचा समावेश होता.

हेही वाचा :

  1. अफगाणिस्तान-न्यूझीलंड कसोटी सामना रद्द, WTC ​च्या पॉइंट टेबलवर काय होणार परिणाम? भारताला फायदा की नुकसान? - WTC Point Table Update
  2. भारतीय क्रिकेटच्या 91 वर्षांच्या इतिहासात 'असं' पहिल्यांदाच घडलं... - AFG vs NZ Only Test
Last Updated : Sep 13, 2024, 4:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details