T20 World Cup 2024 IND vs SA final:भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज टी-20 विश्वचषक क्रिकेट 2024 चा अंतिम सामना रंगणार आहे. या विश्वचषकात भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. भारतानं सलग 7 सामने जिंकले आहेत. अंतिम सामन्यात भारतीय खेळाडूंकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा आहे. या सामन्यात भारताचे 5 खेळाडू आफ्रिकेसाठी धोकादायक ठरू शकतात. जाणून घ्या कोण आहेत 'ते' पाच खेळाडू.
रोहित शर्मा :भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 92 धावांची खेळी केली. तर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावलं होतं. या विश्वचषकात रोहितनं 8 डावात 2 अर्धशतकांसह 248 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 22 चौकार आणि 15 षटकार आहेत. रोहितनं आफ्रिकेविरुद्धच्या 16 टी-20 डावांमध्ये 1 शतक आणि 2 अर्धशतकांसह 420 धावा केल्या आहेत.
रोहित शर्मा (IANS PHOTOS) विराट कोहली : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची बॅट या टी-20 विश्वचषकात शांत राहिली आहे. कोहलीला या विश्वचषकात आतापर्यंत 8 डावांमध्ये काही खास कामगिरी करता आलेली नाही. पण, मोठ्या सामन्यांमध्ये किंग कोहलीची बॅट अनेकदा चालली आहे. त्यामुळे या सामन्यात सर्वांच्या नजरा त्याच्यावर असतील. विराटनं आफ्रिकेविरुद्धच्या 12 डावात 318 धावा केल्या असून त्यात नाबाद 72 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. या कालावधीत त्यानं 2 अर्धशतकं झळकावली आहेत.
विराट कोहली (IANS PHOTOS) सूर्यकुमार यादव : सूर्यकुमार यादव आफ्रिकेसाठी धोकादायक ठरू शकतो. सूर्यानं आफ्रिकेविरुद्ध 6 सामन्यात 68.60 च्या सरासरीनं आणि 177.72 च्या स्ट्राइक रेटनं 343 धावा केल्या आहेत, ज्यात 1 शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. भारताच्या या खतरनाक फलंदाजापासून आफ्रिकन गोलंदाज सावध राहावं लागेल.
सूर्यकुमार यादव (IANS PHOTOS) अर्शदीप सिंग :भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगनं टी-20 विश्वचषक 2024 मध्ये अप्रतिम गोलंदाजी केलीय. अर्शदीपनं आतापर्यंत 7 सामन्यात 15 बळी घेतलं आहेत.
अर्शदीप सिंग (IANS PHOTOS) जसप्रीत बुमराह : बुमराहनं या विश्वचषकात आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. भारतीय संघाला जेव्हा-जेव्हा विकेटची गरज पडली, तेव्हा बुमराहनं संघाला विकेट मिळवून दिलीय. अशा स्थितीत आफ्रिकेला या भारतीय गोलंदाजापासून सावध राहावं लागणार आहे. बुमराहनं टी-20 विश्वचषक 2024 मध्ये 7 डावात 13 विकेट घेतल्या आहेत. त्याची सर्वोत्तम खेळी म्हणजे 7 धावात 3 विकेट आहे.
जसप्रीत बुमराह (IANS PHOTOS) हेही वाचा
- टीम इंडिया 'विजयी भव'; भारताच्या विजयासाठी चाहत्यांकडून प्रार्थना, कुठे होमहवन तर कुठे आरती - T20 World Cup 2024
- रोहितसेना इतिहास बदलणार? भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान; कोणत्या संघाचा वरचष्मा? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड - T20 World Cup 2024 Final
- टी 20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यावर पावसाचं सावट; सामना न झाल्यास कोण होणार विश्वविजेता? - T20 World Cup Final
- भारताच्या शेफाली वर्मानं रचला इतिहास...! महिलांच्या कसोटी सामन्यात केला 'हा' भीम पराक्रम - INDW vs SAW Only Test