महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

बांगलादेशविरुद्धच्या कानपूर कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा; संघात कोणते बदल? - IND vs BAN Kanpur Test Squad

Team India Squad For Bangladesh 2nd Test : भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबरपासून ग्रीन पार्क, कानपूर इथं खेळवला जाणार आहे. या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

Team India Squad
Team India Squad (IANS Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 22, 2024, 1:09 PM IST

मुंबई Team India Squad For Bangladesh 2nd Test : भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबरपासून ग्रीन पार्क, कानपूर इथं खेळवला जाणार आहे. भारतीय संघानं बांगलादेशविरुद्ध चेन्नई कसोटी 280 धावांनी जिंकली होती. आता कानपूर कसोटी सामना जिंकून बांगलादेशचा सफाया करणे हे त्याचं ध्येय असेल.


हार्दिकला स्थान नाही : दरम्यान, दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय निवडकर्त्यांनी बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताला दणदणीत विजय मिळवून देणारा संघ कायम ठेवला आहे. याचा अर्थ 16 सदस्यीय भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच केएल राहुल आणि सरफराज खान यांचा पुन्हा फलंदाज म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. तर हार्दिक पांड्याला या संघातही स्थान मिळालं नाही.

पहिल्या कसोटीचा संघ कायम : रोहित शर्मा कर्णधारपद सांभाळणार आहे. तर आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव यांची फिरकीपटू म्हणून निवड करण्यात आली. ऋषभ पंत यष्टिरक्षक म्हणून पहिली पसंती असेल. ध्रुव जुरेलची दुसरा यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली. तर वेगवान गोलंदाजीत मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल यांचा समावेश आहे. विराट कोहली, शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल हे देखील कानपूर कसोटीत चमक दाखवतील.

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.

हेही वाचा :

  1. भारताच्या विजयानंतर WTC पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापलथ; बांगलादेशला 440 व्होल्टचा धक्का - WTC Pont Table
  2. चेन्नई कसोटीत रविचंद्रन अश्विनचा डबल धमाका, भारतीय संघाचा मोठा विजय; बांगलादेशचं पाणीपत - India Beat Bangladesh

ABOUT THE AUTHOR

...view details