Pat Cummins Record Hat Trick :ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सनं क्रिकेट इतिहासात नवा विक्रम रचला आहे. अफगाणिस्तानच्या सुपर-8 सामन्यात पॅट कमिन्सनं हॅट्रिक केलीय. विशेष म्हणजे मागील सामन्यात बांगलादेश विरुद्वही त्यानं हॅट्रिक केली होती. सलग 2 सामन्यात पॅट कमिन्सनं 2 वेळा हॅट्रिक केली आहे. टी20 क्रिकेटच्या सामन्यांमध्ये विकेट घेत दोनवेळा हॅटट्रिक करणारा कमिन्स हा पाचवा गोलंदाज ठरला आहे.
विश्वचषकात सलग 2 सामन्यात 2 वेळा हॅट्रिक घेणारा पॅट कमिन्स पहिला आणि एकमेव गोलंदाज ठरला आहे. या सामन्यात कमिन्सनं 4 षटकांत 28 धावा देत 3 विकेट घेतल्या. यासह त्यानं टी-20 विश्वचषक 2024 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप-5 गोलंदाजांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. याआधीच्या सामन्यात पॅट कमिन्सनं बांगलादेशविरुद्ध हॅट्रिक घेतली होती. कमिन्सनं बांगलादेशच्या महमुदुल्लाह, मेहदी हसन आणि तौहीद हृदय या तीन महत्त्वाच्या फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत हॅट्रिक केली होती. कमिन्सनं अफगाणिस्तानविरुद्ध 18 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रशीद खानला बाद केलं. त्यानंतर 20 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर करीम जनतला ड्रेसिंग रूममध्ये पाठवलं. यानंतर दुसऱ्या चेंडूवर (19.2 षटकं) गुलबदीन नायबला बाद केलं. कमिन्सनं या विश्वचषकात आतापर्यंत 4 सामने खेळले आहे. त्यानं 4 डावात 10.66 च्या सरासरीनं 9 विकेट्स घेतल्या आहेत.