शिर्डी (अहिल्यानगर) Suryakumar Yadav Visits Shirdi : भारतीय T20 क्रिकेट संघाचा कर्णधार तथा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव बुधवारी सपत्नीक शिर्डीत येत साई बाबांच्या चरणी नतमस्तक झाला. तसंच दर्शनानंतर त्यानं माध्यमांशी संवादही साधला.
दर्शनानंतर सूर्याचा सत्कार : भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवनं पत्नी देवीशा शेट्टी समवेत बुधवारी माध्यन्ह आरतीनंतर शिर्डीत साईंच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. दर्शनानंतर साईबाबा संस्थानच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सूर्यकुमार यादवचा सत्कारही केला. याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
सूर्या पत्नीसह साई चरणी लीन (ETV Bharat Reporter) काय म्हणाला सूर्या : साईबाबांच्या दर्शनानंतर सूर्याकुमारनं प्रसार माध्यमांनी संवाद साधला यावेळी त्यानं सांगितलं की, "आजपर्यंत साईबाबांनी दिलेल्या यशाबद्दल आज बाबांना धन्यवाद देण्यासाठी शिर्डीला आलो असून यापुढंही अशीच मेहनत करण्याची शक्ती देवो अशी प्रार्थना साईबाबाकडे केली आहे. या व्यतिरिक्त बाबांकडे जे मागितलं ते तुम्हाला सांगणार नाही" असंही सूर्यकुमारनं सांगितलं. तसंच अनेक दिवसांपासून यायचं होत, पण येता आलं नाही. आता बायको म्हणाली बाबांनी बोलावलंय तर दर्शनाला आल्याचं सूर्यानं सांगितलं.
इंग्लंडची तयारी सुरु करणार : तसंच या महिन्यात इंग्लंडविरुद्ध T20 ची मालिका होत आहे. यावर बोलतांना सूर्या म्हणाला की, "त्याची तयारी आता साई दर्शनानंतर सुरु करु. आज इथं आलो आहे. इथं येवून मनात चांगले विचार येतात. अशाच संधी या पुढं काही करण्यासाठी मिळाल्यातर चांगलच आहे. त्यासाठी मेहनत करायला हवं, जे मिळायचं ते पुढे मिळत राहील." यावेळी सूर्याच्या टोपणनावाबद्दल विचारलं असता ते तर माझ्या पत्नीलाच माहीत असून माझं नाव मोठं असल्यानं ती 'स्काय' नावानं मला बोलवत असल्याचं मिश्कील उत्तर त्यानं दिलं.
हेही वाचा :
- माजी क्रिकेटपटू झहीर खान साईचरणी लीन; दर्शनानंतर म्हणाला...
- मूर्ती लहान पण कीर्ती महान..! 6 वर्षीय जलतरणपटू रेयांशनं केला महापराक्रम; थेट 'इंडिया बुक ऑफ रेकाँर्ड'मध्ये नाव