दांबुला (श्रीलंका) SL vs WI 1st T20I Live Streaming : श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला T20I सामना 13 ऑक्टोबर (रविवार) रोजी IST संध्याकाळी 07:00 वाजता रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दांबुला इथं खेळवला जाईल. श्रीलंकेच्या संघाचं नेतृत्व चारिथ असालंका करणार आहे. भारताविरुद्धच्या T20I मालिकेत त्यांची कामगिरी चांगली नव्हती आणि त्यांना 3-0 नं पराभव पत्करावा लागला. मात्र, सनथ जयसूर्याच्या प्रशिक्षकपदाच्या काळात त्यांनी एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. यावेळी श्रीलंकेच्या संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजचा पराभव करुन मालिका जिंकायची आहे.
संघांची आताची कामगिरी कशी : गेल्या पाच सामन्यांतील श्रीलंकेच्या कामगिरीवर नजर टाकली तर, संघानं केवळ एकच सामना जिंकला आहे, तर दोन सामन्यांत पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. याशिवाय एका सामन्याचा निकाल लागला नाही तर एक बरोबरीत राहिला. त्याचवेळी, वेस्ट इंडिजनं गेल्या पाच सामन्यांत चार सामने जिंकले आहेत आणि एक सामना गमावला आहे. या मालिकेत श्रीलंकेचा संघ चरिथ असलंकाच्या नेतृत्वाखाली असेल, तर वेस्ट इंडिजचा संघ रोवमन पॉवेलच्या नेतृत्वाखाली खेळेल.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : आकडेवारीनुसार, वेस्ट इंडिजविरुद्ध श्रीलंकेचा संघ मजबूत वरचढ असल्याचं दिसतं. उभय संघांमध्ये त्यांच्या T20 कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 15 सामने खेळले गेले आहेत. यात श्रीलंका संघानं 8 सामने जिंकले आहेत, तर वेस्ट इंडिज संघानं 7 सामने जिंकले आहेत.
- श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला T20 सामना कधी खेळला जाईल?
श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा T20 सामना रविवार, 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
- श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला T20 सामना कुठं खेळवला जाईल?
श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला T20 सामना रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दांबुला इथं होणार आहे.
- श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला T20 सामना किती वाजता सुरु होईल?
श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला T20 सामना भारतीय वेळेनुसार रात्री 7 वाजता सुरु होईल.
- श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला T20 सामना टीव्हीवर कुठं पाहायचा?