शारजाह INDW vs AUSW Live Streaming : भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेतील 18वा सामना आज 13 ऑक्टोबर (रविवार) रोजी शारजाह येथील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 07:30 वाजता खेळवला जाईल.
A blockbuster rematch of the #T20WorldCup 2023 semi-final and two European rivals facing off 👊
— ICC (@ICC) October 13, 2024
Day 11 preview 👉 https://t.co/NRYQDcMH1y pic.twitter.com/mky4WC6nzQ
भारतासाठी विजय आवश्यक : ऑस्ट्रेलिया आणि भारत दोन्ही संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. ऑस्ट्रेलियानं पहिले तिन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळं ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरी गाठणार हे जवळपास निश्चित झालं आहे. तर दुसरीकडे उपांत्य फेरी गाठण्यासाठी आपला दावा बळकट करण्यासाठी भारताला कोणत्याही किंमतीवर विजय नोंदवावा लागेल. भारताची लिटमस टेस्ट बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.
ऑस्ट्रेलियाचे दोन खेळाडू जखमी : दिलासादायक म्हणजे भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे दोन खेळाडू जखमी झाले होते. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाची कर्णधार ॲलिसा हिलीला दुखापत झाल्यानं तिला सामना अर्ध्यात सोडून बाहेर जावं लागलं. तर क्षेत्ररक्षण करताना टायला व्लामिंकला उजव्या खांद्याला दुखापत झाली. चौकार वाचवताना तिचा गुडघा जमिनीत अडकला आणि तिचा उजवा खांदा फ्रॅक्चर झाला. भारताविरुद्ध या दोन्ही खेळाडूंचं खेळणं संशयास्पद मानलं जात आहे.
दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड कसा : भारताविरुद्ध हेड टू हेड रेकॉर्डवर ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत खेळण्यात आलेल्या 34 T20मध्ये ऑस्ट्रेलियानं 25 वेळा विजय मिळवला आहे, तर भारतानं केवळ 8 वेळा विजय मिळवला आहे. तर एक सामना निकालाविना संपला.
मैदानाची खेळपट्टी कशी असेल : या मैदानावर महिला T20 विश्वचषक स्पर्धेचे आठ सामने झाले आहेत. ज्यात पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 117 आहे. शारजाहमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी रात्रीच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेदरम्यान तिन्ही वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळं नाणेफेक जिंकणारा संघ खेळपट्टीवर सुरुवातीच्या गतीचा फायदा घेण्यासाठी प्रथम फलंदाजी करणे पसंत करेल, अशी शक्यता आहे. ऑस्ट्रेलियानं यापूर्वीच शारजाहमध्ये दोन सामने खेळले आहेत, ज्यामुळं त्यांना 13 ऑक्टोबर रोजी खेळपट्टी कशी कामगिरी करु शकते याची कल्पना असेल.
𝙒𝙝𝙖𝙩'𝙨 𝙮𝙤𝙪𝙧 𝙛𝙞𝙧𝙨𝙩 𝙩𝙝𝙤𝙪𝙜𝙝𝙩 𝙬𝙝𝙚𝙣 𝙮𝙤𝙪 𝙝𝙚𝙖𝙧 𝙩𝙝𝙚 𝙬𝙤𝙧𝙙 𝙎𝙝𝙖𝙧𝙟𝙖𝙝❓#TeamIndia answers 💬
— BCCI Women (@BCCIWomen) October 12, 2024
Watch The Feature 🎥 🔽 - By @ameyatilak #T20WorldCup | #WomenInBlue | #INDvAUS | @sachin_rt
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा भारत महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला सामना कधी खेळला जाईल?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा भारत महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला सामना रविवार, 13 ऑक्टोंबर रोजी होणार आहे.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा भारत महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला सामना कुठं खेळवला जाईल?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा भारत महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला सामना शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह इथं होणार आहे.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा भारत महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला सामना किती वाजता सुरु होईल?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा भारत महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 07:30 वाजता सुरु होईल.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा भारत महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला टीव्हीवर कुठं पाहायचा?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा भारत महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा भारत महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पहायचं?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा भारत महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही डिस्ने+हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर पाहू शकाल.
दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :
भारतीय महिला क्रिकेट संघ : शेफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, सजीवन सजना, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग.
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ : फोबी लिचफिल्ड, बेथ मूनी (यष्टिरक्षक), एलिस पेरी, ऍशले गार्डनर, जॉर्जिया वेरेहॅम, अलाना किंग, ताहलिया मॅकग्रा (कर्णधार), ॲनाबेल सदरलँड, सोफी मोलिनक्स, मेगन शुट, किम गर्थ.
हेही वाचा :