डरबन Sri Lanka Scored Lowest Ever Total : दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना डरबनच्या किंग्समीड इथं खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी यजमान दक्षिण आफ्रिकेचा संघ 191 धावांवर ऑलआऊट झाला असताना प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ केवळ 42 धावांवरच मर्यादित राहिला. त्यांनी फक्त 13.5 षटकं फलंदाजी केली.
0,0,0,0,0...पाच फलंदाज शुन्यावर आउट, कसोटीत अवघ्या 13.5 षटकांत विश्वविजेत्यांचा खुर्दा - SRI LANKA LOWEST TEST TEAM TOTAL
श्रीलंका क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी केवळ 42 बाद होत त्यांची आतापर्यंतची सर्वात कमी कसोटी धावसंख्या केली.
Published : Nov 28, 2024, 6:15 PM IST
कसोटीत श्रीलंकेची सर्वात निचांकी धावसंख्या: कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ही श्रीलंकेची आतापर्यंतची सर्वात कमी कसोटी धावसंख्या आहे. या कसोटी सामन्यात मार्को जेन्सननं असा कहर केला की, श्रीलंकेच्या फलंदाजांकडं त्याच्या गोलंदाजीचं उत्तर नव्हतं. मार्कोनं गोलंदाजीत केवळ 6.5 षटकांत 13 धावा देत सात बळी घेतले. तर श्रीलंकेकडून कमिंडू मेंडिस आणि लाहिरू कुमारा हे दोनच फलंदाज होते ज्यांनी दुहेरी आकडा पार केला. त्यांचे पाच फलंदाज तर शुन्यावर आउट झाले.
100 वर्षांनी घडलं असं: या डावात श्रीलंकेचा संघ अवघ्या 83 चेंडूत ऑलआऊट झाला, यासह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत ऑलआऊट होणारा हा दुसरा संघ ठरला. यापूर्वी 1924 मध्ये एजबॅस्टन इथं इंग्लंडविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा संघ 75 चेंडूत 30 धावांवर बाद झाला होता. याचाच अर्थ कसोटी क्रिकेटमध्ये 100 वर्षांनंतरही कोणत्याही संघाची इतकी वाईट अवस्था झालेली नाही.