महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

9 वर्षांनंतर युवा फलंदाज पाहुण्यांविरुद्ध द्विशतक झळकावत इतिहास रचणार? 'इथं' पाहा लाईव्ह मॅच - SA VS PAK 2ND TEST DAY 2 LIVE

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना 03 जानेवारीपासून सुरु झाला आहे.

SA vs PAK 2nd Test Day 2
दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज (CSA X Handle)

By ETV Bharat Sports Team

Published : Jan 4, 2025, 11:24 AM IST

Updated : Jan 4, 2025, 12:15 PM IST

केपटाऊन SA vs PAK 2nd Test Day 2 Live Stream : दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ 03 जानेवारी (शुक्रवार) पासून न्यूलँड्स, केपटाऊन इथं दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी यजमानांचं वर्चस्व पाहायला मिळालं. पुनरागमन करण्यासाठी पाकिस्तानला दुसऱ्या दिवशी चांगली गोलंदाजी करावी लागेल, अन्यथा सामना त्यांच्या हातातून जाऊ शकतो.

पहिल्या दिवशी काय झालं :दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी शानदार फलंदाजी करत दिवसअखेर 80 षटकांत 4 गडी गमावून 316 धावा केल्या. कर्णधार टेंबा बावुमा आणि रायन रिकेल्टन यांच्या दमदार खेळीनं संघाला मजबूत स्थितीत आणलं. बावुमानं 179 चेंडूंत 9 चौकार आणि 2 षटकारांसह 106 धावांची शानदार शतकी खेळी केली.

रिकेल्टन द्विशतकाच्या उंबरठ्यावर : दुसरीकडे, रायन रिकेल्टन खेळपट्टीवर राहिला आणि त्यानं 232 चेंडूत 21 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 176 धावा केल्या. दोन्ही फलंदाजांमध्ये झालेल्या 235 धावांच्या विक्रमी भागीदारीनं पाकिस्तानला बॅकफूटवर ढकललं. आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रायन रिकेल्टनला द्विशतक झळकावण्याची संधी असेल. यापुर्वी कसोटीत दक्षिण आफ्रिकेसाठी 2016 मध्ये शेवटचं द्विशतक झालं होतं. दिग्गज फलंदाज हाशिम आमलानं 2 जानेवारी 2016 रोजी केपटाऊनमध्ये इंग्लंडविरुद्ध 201 धावांची खेळी केली होती. यानंतर आता रायन रिकेल्टनला दिग्गजांच्या क्लबमध्ये सामिल होण्याची संधी आहे.

आफ्रिकेच्या भूमिवर पाकिस्तानची खराब कामगिरी : दक्षिण आफ्रिकेत पाकिस्तानचा विक्रम तितकासा प्रभावी ठरला नाही. त्यांनी आफ्रिकेत आतापर्यंत 15 कसोटी सामने खेळले आहेत, त्यांनी फक्त 2 जिंकले आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या दोन्ही बॉक्सिंग-डे कसोटीत पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी 2007 मध्ये शेवटच्या वेळी दक्षिण आफ्रिकेच्या धर्तीवर कसोटी सामना जिंकला होता. त्यानंतर त्यांना दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामना जिंकता आलेला नाही.

दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान या संघांमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 29 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेची कामगिरी खूपच प्रभावी ठरली आहे. या 29 सामन्यांपैकी दक्षिण आफ्रिकेनं 16, तर पाकिस्ताननं केवळ 6 सामने जिंकले आहेत. 7 सामने अनिर्णित राहिले. या आकडेवारीवरुन हे स्पष्ट होतं की, कसोटी प्रकारात दक्षिण आफ्रिकेचं पाकिस्तानवर वर्चस्व आहे. यासह देशांतर्गत परिस्थितीचा फायदा दक्षिण आफ्रिकेला आणखी मजबूत बनवतो.

WTC फायनलमध्ये पोहोचणारा दक्षिण आफ्रिका पहिला संघ : जर आपण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलबद्दल बोललो तर दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. एका दिवसापूर्वीच दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या कसोटीत पाकिस्तानचा पराभव करुन WTC च्या अंतिम फेरीत आपलं स्थान पक्कं केलं आहे. दक्षिण आफ्रिकेचं पीसीटी सध्या 66.89 आहे. ऑस्ट्रेलियन संघ अजूनही दुसऱ्या स्थानावर आहे.

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात दुसऱ्या कसोटीचा दुसऱ्या दिवसाचा खेळ कधी आणि कुठं होणार?

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा दुसऱ्या दिवसाचा खेळ शनिवार 4 जानेवारी रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 2:00 वाजता केपटाऊनमधील न्यूलँड्स इथं सुरु होईल.

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा दुसऱ्या दिवसाचा खेळ कुठं आणि कसा पाहायचा?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान कसोटी मालिका भारतातील टीव्हीवर स्पोर्ट्स 18-1 एसडी आणि स्पोर्ट्स 18-1 एचडी चॅनेलवर थेट प्रसारित केली जाईल. तसंच जिओ सिनेमा ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

दोन्ही संघांची प्लेइंग 11 :

दक्षिण आफ्रिका : एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, विआन मुल्डर, ट्रिस्टन स्टब्स, टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेने (यष्टिरक्षक), मार्को जॉन्सन, केशव महाराज, कागिसो रबाडा, क्वेना म्फाका.

पाकिस्तान : शान मसूद (कर्णधार), सैम अयुब, बाबर आझम, कामरान गुलाम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (यष्टिरक्षक), सलमान आगा, आमेर जमाल, मीर हमजा, खुर्रम शहजाद, मोहम्मद अब्बास

हेही वाचा :

  1. अद्वितीय बुमराह...! कांगारुंच्या भूमीवर मोडला 47 वर्षे जुना विक्रम
  2. 18 वर्षांनंतर पाहुण्यांचा संघ आफ्रिकेत सामना जिंकत टीम इंडियाला मदत करणार? 'इथं' पाहा निर्णायक मॅच लाईव्ह
Last Updated : Jan 4, 2025, 12:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details